BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३ मार्च, २०२३

आमदारांच्या घरात सापडले मोठे घबाड ! आमदारपुत्राला ठोकल्या बेड्या !




शोध न्यूज : इतर पक्षापेक्षा वेगळे असल्याचा दावा करणाऱ्या भाजपच्या आमदारांच्या घरात कोट्यावधीचे घबाड सापडले असून आमदारपुत्र चाळीस लाखाची लाच घेताना रंगेहात पकडला गेला आहे. 


'ना खाउंगा, ना खाने दुंगा' अशा ढोल वाजवत भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात आले आणि भ्रष्टाचार संपविणार असल्याच्या घोषणाही सतत केल्या गेल्या पण याच पक्षातील काही नेते मोठ्या प्रकरणात अडकत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. 'अच्छे दिन' हा तर केवळ एक जुमालाच ठरला पण भ्रष्टाचारात देखील भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्याची नावे गाजली आहेत. इतरांपेक्षा वेगळा असल्याचा आभास भाजपने निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण प्रत्यक्षात असलेली वस्तुस्थिती वेगळीच आहे हे आता जनतेला समजले असून वाढत्या महागाईने सामान्य जनतेचा जीव मेटाकुटीला आला आहे. भारतीय जनता पक्षाच्या आमदाराचा मुलगा मात्र लाखोंची लाच घेताना रंगेहात सापडत आहे तर आमदाराच्या घरात कोट्यावधीचे घबाड आढळून आले आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.


महाराष्ट्राला लागून असलेल्या कर्नाटक राज्यातील भारतीय जनता पक्षाचे आमदार मदल विरुपक्षाप्पा यांचा मुलगा प्रशांत कुमार याला तब्बल चाळीस लाखांची लाच घेताना लोकायुक्तांनीच पकडला आहे. रंगेहात पकडल्यानंतर त्याला बेड्या ठोकण्यात आल्याच पण त्यानंतर मोठे घबाड उजेडात आले आहे. आमदार पुत्र प्रशांत कुमार याला आमदार असलेल्या त्याच्या वडिलाच्या 'कर्नाटक सोप अँड डिटर्जंट लिमिटेड'  या बंगळूरू येथील कार्यालयातून अटक करण्यात आली आहे. या अटकेची बातमी बाहेर येताच आधी कर्नाटक राज्यात आणि नंतर देशभरात खळबळ उडाली आहे. या अटकेनंतर लोकायुक्तांनी कार्यालय आणि प्रशांतकुमार याच्या घरावर छापा टाकला आणि या छाप्यात तब्बल ६.१० कोटींची रोख आणि बेहिशोबी रक्कम आढळून आली. एवढी मोठी रक्कम रोख स्वरुपात पाहून लोकायुक्त अधिकारी यांचे डोळे देखील विस्फारले गेले. सामान्य नागरिक तर या घटनेने हवालदिल झाले असून त्यांची बोटे भारतीय जनता पक्षाकडे उचलली गेली आहेत. हाच का तो स्वच्छ पक्ष ? असा सवाल देखील लोक उपस्थित करू लागले आहेत. 


 या घटनेनंतर भाजप आमदार मदल वीरूपक्षप्पा यांनी हात वर केले असून मुलाने ज्या टेंडरमध्ये लाच घेतली आहे त्याच्याशी आपला काहीच संबंध नाही, आपण केएसडीएलच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे असे सांगून स्वत:ला वेगळे करण्याचा प्रयत्न केला आहे पण या प्रकरणात मुलगा आणि वडील हे दोघेही दोषी असल्याचे लोकायुक्तांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे आमदारपुत्र प्रशांत कुमार हे प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. साबण आणि इतर डिटर्जंट बनवण्यासाठी कच्चा माल खरेदी करण्यासाठी त्यांनी कंत्राटदाराकडे ८१ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर ठेकेदाराने लोकायुक्तांकडे याबाबत तक्रार केली होती. या तक्रारीवरून लोकायुक्त यांनी रंगेहात पकडण्यासाठी सापळा लावला आणि मुसक्या आवळल्या. सदर रक्कम आमदास्र मदल विरूपक्षप्पा याच्या वतीने घेण्यात आली असल्याचे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे या प्रकरणात आमदार आणि त्यांचे पुत्र हे दोघेही आरोपी आहेत असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. आपण मात्र कोणत्याही प्रकरणात सहभागी नसून मुलगा लोकायुक्तांच्या ताब्यात असल्याने आपले मुलासोबत देखील बोलणे झाले नाही असे आमदार सांगत आहेत.  


शासकीय अधिकारी, कर्मचारी किरकोळ रकमेची लाच घेताना आढळतात पण येथे भाजपचे आमदार आणि त्यांचे पुत्र लाखोंच्या लाचेत अडकले असून त्यांच्या घर, कार्यालयात कोट्यावधीची रोख रक्कम आढळून आली आहे यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालीच आहे (BJP MLA and his son in trouble in bribery case) पण सामान्य नागरिक देखील अवाक झाले आहेत. स्वच्छ प्रतिमेचा डांगोरा पिटणाऱ्या भारतीय जनता पक्षाला देखील यामुळे अडचण निर्माण झाली आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !