BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ जाने, २०२४

शरद पवार म्हणतात, " त्याने माझे घर फोडले, मला त्यांना गाडायचं !


शोध न्यूज :  "त्याने माझे घर फोडले, मला त्यांना गाडायचंय " असे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना म्हटल्याचा गौप्यस्फोट जेष्ठ नेते अनंत गिते यांनी केला असल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.


शिवसेनेशी गद्दारी झाल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षालाही फुटीची लागण झाली, पवारांचे पुतणे अजित पवार यांनी चुलत्याला धोका देत खूप मोठी राजकीय खेळी खेळली. महाराष्ट्रात या राजकीय भूकंपाचे धक्के बसले पण शरद पवार यांनी याबाबत फारसे काहीच दाखवले नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादीची फुट हा शरद पवार यांचाच डाव आहे अशी शंका घेतली जात होती. अनेकांनी तसे बोलूनही दाखवले होते. शरद पवार यांचे राजकारण भल्याभल्यांना समाजत नाही त्यामुळे अशा शंका नेहमीच उपस्थित होत असतात. राष्ट्रवादीत एवढा मोठा राजकीय भूकंप होऊनही शरद पवार कुठेच विचलित होताना दिसले नाही की त्यांनी काही आक्रमक विधानेही केली नाहीत. अजित पवार यांनी जाहीर सभेत शरद पवार यांच्यावर जहरी टीका देखील केली पण त्यालाही शरद पवार यांनी फारसे महत्व दिले नाही. त्यामुळे राज्यात संभ्रम निर्माण झाला परंतु जेष्ठ नेते अनंत गिते यांनी मात्र एक धक्कादायक दावा केला आहे.


सुनील तटकरे यांनी माझं घर फोडलं. त्यामुळे मला तटकरेंना गाडायचं आहे, असं शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलं असून त्यामुळेच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे माझ्या नावाची शिफारस केली आहे, असा खळबळजनक दावा अनंत गिते यांनी केला आहे. साहजिकच या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. शरद पवार बोलत नाहीत पण त्यांच्या मनात असलेला संताप आणि  खदखद यातून बाहेर येत असल्याचे दिसून आले आहे. अनंत गिते यांनी हा दावा थेट प्रसार माध्यमांच्या पुढेच केला आहे. याचे वेगवेगळे अर्थ लावले जात असले तरी, हा दावा जर सत्य असेल तर शरद पवार यांच्या मनात किती राग आणि संताप कोंडलेला आहे हेच पाहायला मिळत आहे. (Sharad Pawar's political plan revealed) या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडालीच आहे. शरद पवार बोलत नसले तरी त्यांच्या मनात किती असंतोष आहे हे या दाव्यातून समोर आले आहे. शिवाय राष्ट्रवादीची फुट ही  ठरवून केली असल्याचा आरोप करणाऱ्याना देखील एक मोठी चपराक बसली आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत देखील गिते यांनी विधान केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महिनाभरात राजीनामा देतील, अपात्रतेच निकाल आपल्याच बाजूने येणार असून, शिंदे  गटाचे १६ आमदार हे अपात्र ठरतील त्यामुळे पुन्हा आपले दिवस परत येणार आहेत असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या विधानाची देखील चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.  मी पुन्हा येईन, पुन्हा येईन यासाठीच खालच्या आणि नीच पातळीचे राजकरण केले गेले आहे. एका माणसाच्याहट्टासाठी आमदार फुटले असून महाराष्ट्रातील राजकारण गलिच्छ झाले आहे. १०५ आमदार असतानाही ४० आमदार फोडण्यात आले तरीही भाजपची भूक भागत नाही, भारतीय जनता पक्ष आता घरे फोडायला निघाला आहे, त्यांना केंद्रातही सत्ता हवी आहे आणि राज्यात देखील सत्ता पाहिजे आहे त्यामुळे त्यांना भस्म्या रोग झाला आहे. असा हल्ला देखील गिते यांनी चढवला आहे. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !