BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ एप्रि, २०२२

आरोपींना पकडण्यास गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला !

 



परंडा : आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर जबरदस्त हल्ला करण्यात आला असून पोलिसांच्या डोळ्यात चटणी फेकून काठ्या कुऱ्हाडीने हल्लाच चढविण्यात (Attack on Police)  आल्याने अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना कुर्डूवाडी रोडजवळ घडली आहे.  


शेतीच्या वादातून दाखल झालेल्या गुन्ह्यात पोलीसांचे पथक पाटील वस्तीवर गेले होते, कुर्डूवाडी रोडच्या लगत असलेली पाटील वस्ती ही परंडा शहरापासून चार किमी अंतरावर आहे. पाटील वस्तीवरील उमाकांत पाटील यांच्याकडे पोलीस चौकशी करण्यासाठी गेले असता पोलीस उपनिरीक्षक राजकुमार ससाणे आणि उमाकांत पाटील यांच्या काहीशी बाचाबाची झाली. परंतु हे प्रकरण एवढ्यावर न थांबता ते वाढत गेले आणि बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. पाटील वस्तीवरील उमाकांत पाटील, कृष्णा उमाकांत पाटील, रामराजे उमाकांत पाटील, पल्लवी उमाकांत पाटील,  मुकुंद उमाकांत पाटील, गोविंद उमाकांत पाटील यांनी अचानकपणे दगड, काठी आणि कोयता घेऊन पोलिसावर हल्ला चढवला.   


डोळ्यात चटणी टाकून काठ्या, कुऱ्हाडीचा वापर करून पोलिसांवर प्राणघातक हल्ला चढविण्यात आला यात उपनिरीक्षक ससाणे यांच्यासह पोलीस पथकातील कर्मचारी जखमी झाले. प्रसंगाचे गांभीर्य पाहता पथकातील महिला पोलीस कर्मचारी शबाना मुल्ला यांनी तातडीने पोलीस ठाण्याशी संपर्क साधला आणि या घटनेची माहिती दिली. काही वेळेत पोलिसाची मोठी फौज वस्तीकडे आली पण त्यांना पाहताच पाटील कंपनीने पोलिसांच्या डोळ्यात चटणी फेकली आणि दगडफेक सुरु केली.  पोलीस उपनिरीक्षक ससाणे यांना घरात डांबून काठ्या कुऱ्हाडीने त्यांना मारहाण करण्यात आली. पोलिसांची कुमक आल्यावरही हा थरार सुरूच होता. तब्बल दोन तास हा  राडा सुरु राहिला पण पोलिसांनी उपनिरीक्षक यांची सुटका करवून घेतली.   


त्यानंतर मात्र पोलिसांनी पल्लवी उमाकांत पाटील आणि कृष्णा उमाकांत पाटील यांना ताब्यात घेतले. दरम्यान बाकीचे पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. या हल्ल्यात जखमी झालेले पोलीस उपनिरीक्षक राजकुमार ससाणे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व संबंधितावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसावर हल्ला (Attack on a police squad) करण्याचे धाडस पाहून परिसरातच नव्हे तर उस्मानाबाद जिल्ह्यात चर्चा सुरु झाली आहे. 

हे देखील वाचा : >>


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !