BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ एप्रि, २०२२

भाजपचे नेते आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांना तीन महिने कारावासाची शिक्षा !




अमरावती : भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांना जिल्हा सत्र न्यायालयाने दहा हजाराच्या दंडासह तीन महिन्याच्या कारावासाची (Imprisonment) )शिक्षा ठोठावली आहे. 


सहा वर्षापूर्वी तहसीलदार यांना त्यांच्या कार्यालयात घुसून त्यांना मारहाण केली होती असा आरोप भारतीय जनता पक्षाच्या किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री डॉ अनिल बोंडे (Dr. Anil Bonde, ex Ministar BJP) यांच्यावर होता.  वरुड तहसील कार्यालयात मारहाणीची घटना घडली होती. डॉ. अनिल बोंडे यांनी तहसील कार्यालायात  नायब तहसीलदार  नंदकिशोर वासुदेवराव काळे याना बोलावून घेतले. "का रे हरामखोरा , तू माझ्या लोकांच्या अर्जांपैकी २४० प्रकरणे त्रुटीत का काढली? तुला या कार्यालयात कुणी नियुक्ती दिली ? तुला जिवंत राहायचे आहे की नाही ? माझ्या कार्यकर्त्यांची कामे केली नाहीत तर तुला जिवंत राहू देणार नाही "  अशी दमदाटी करीत नंदकिशोर काळे याना मारहाण केली. यावेळी तलाठी, नायब तहसीलदार आदी या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्याजवळची शासन निर्णयाची प्रत आणि शासकीय कागदपत्रे हिसकावून ती फाडून टाकली होती आणि शिवीगाळ देखील करण्यात आली होती.  


या प्रकरणी नंदकिशोर काळे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी सदर तक्रारीनुसार बोंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.  वरुड पोलिसांनी तपास करून याबाबत न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या खटल्यात आठ साक्षीदार तपासण्यात आले. समोर आलेल्या पुराव्यानुसार न्यायालयाने आरोपी डॉ. अनिल बोंडे यांना भारतीय दंड विधान कलम ३३२ आणि ५०४ अन्वये दोषी धरले आणि तीन महिन्यांची कारावासाची शिक्षा तसेच दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. ( BJP ex-ministers sentenced) दंड न भरल्यात एक महिना सध्या कारावासाची शिक्षा भोगायची आहे. 


भारतीय जनता पक्षातील बड्या नेत्याला आणि राज्याच्या माजी  मंत्र्याला शिक्षा झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राजकारणातील अनेक नेते प्रशासकीय अधिकारी, शासकीय कर्मचारी यांना वेठीला धरीत असतात. आपल्या घरचे नोकर असल्यासारखे त्यांच्याशी वागत असतात. अधिकारी, कर्मचारी दुर्लक्ष करतात पण काही नेते हात उचलण्याचेही धाडस करीत असतात. (Former BJP minister sentenced to three months in jail) शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यावर हात उचलणे, धमकी देणे किती महागात पडू शकते हेच या घटनेने पुन्हा दाखवून दिले आहे. 


हे देखील वाचा : >>

     



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !