नवी दिल्ली : श्रीमंत शेतकरी आता आयकर विभागाच्या रडारवर आले असून दहा लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांची (Agricultural income) माहिती आयकर विभाग घेणार आहे त्यामुळे अनेकजण अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आयकर कायदा १९६१ कलम १० (१) नुसार शेतीचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे परंतु या कायद्याचा गैरफायदा घेतला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. तेलंगणामधील एका शेतकऱ्याने तब्बल एक कोटी नऊ लाखांचे उत्पन्न शेतीतून घेतल्याचे दाखवले आहे. शेतीच्या उत्पन्न दाखवून करातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न अनेकांनी केला असल्याचा संशय वित्त विभागाला आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यानी उत्पन्न दहा लाखांपेक्षा अधिक दाखवले आहे त्यांच्या उत्पन्नाची पडताळणी करण्यात येणार आहे. सदर उत्पन्न हे खरोखरच शेतीचे आहे की नाही ? याची तपासणी केली जाणार आहे. श्रीमंत शेतकऱ्यांना तर अधिकच कडक तपासणीला सामोरे जावे लागणार आहे. दहा लाखांपेक्षा अधिक उत्पन्न शेतीतून मिळाल्याचे दाखवलेले शेतकरी आता स्कॅनरच्या (Income Tax) कक्षेत येणार आहेत.
योग्य मूल्यांकन आणि कागदपत्रांची पडताळणी न करता अधिकाऱ्यांनी २२.५ टक्के प्रकरणात करमुक्त दावे मंजूर केले आहेत त्यामुळे करचुकवेगिरी करण्यास जागा मिळाली असल्याचे म्हटले आहे. दहा लाखांपेक्षा अधिकचे शेती उत्पन्न दाखविलेल्या प्रकरणात थेट कर सवलतीचे दावे तपासण्यासाठी वित्त विभागाने आपली एक प्रणाली तयार करण्यात आलेली आहे. यामुळे शेतीच्या उत्पन्नाच्या नावाखाली कर चुकविलेल्याना मोठा दणका बसणार आहे तर केंद्र सरकारच्या तिजोरीत मोठी रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. (Rich farmers on the radar of the income tax department) कृषी उत्पन्नाला आयकरात सूट असल्याने शेतीचे उत्पन्न दाखवून कर चुकवला जात असल्याचे निदर्शनास येत असल्याने ही पडताळणी केली जाणार आहे.
हे देखील वाचा :
- चाकूचा धाक दाखवत वृद्ध महिलेला लुटले !
- उजनीचा 'छोटा मासा' लागला गळाला !
- --- अन्यथा महावितरणला टाळे ठोकू !
अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !