BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ एप्रि, २०२२

पंढरपूरच्या इंजिनियर तरुणाची दुर्दैवी आत्महत्या !

 



पंढरपूर : पंढरपूर येथील इंजिनियर असलेल्या एका तरुणाने आत्महत्या तरुणाने पैठण येथे आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आल्याने पंढरीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.  



तरुणांच्या आत्महत्येचे प्रमाण अलीकडे वाढलेले असून अत्यंत सामान्य बाबीसाठीही तरुण आपली जीवन संपवतात यामुळे गेल्या काही काळात चिंता व्यक्त होत आहे. पंढरपूर येथील विजापूर गल्लीत राहणारे निवृत्त नायब तहसीलदार दत्तात्रय चांडोले यांचा मुलगा निखील दत्तात्रय चांडोले याने पैठण येथे गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. सदर आत्महत्या ही प्रेमप्रकरणातून झाली असल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर येत आहे.  निखील हा दत्तात्रय चांडोले यांचा एकुलता एक मुलगा होता. ऐन तारुण्यातील आत्महत्येच्या या घटनेने पंढरपूर शहरात हळहळ व्यक्त करण्यात येवू लागली आहे. 



आत्महत्या केलेला तरुण निखील दत्तात्रय चांडोले याचे वय केवळ २४ वर्षांचे होते आणि तो पैठण येथे शिक्षणासह नोकरी देखील करीत होता. निखीलने इंजिनिअरचे शिक्षण घेतले असून तो पैठण येथील एमआयडीसी मधील एका कंपनीत काम करीत होता.  दिवसभर नोकरी करून तो रात्री आपल्या रूमवर आला आणि मध्यरात्रीच्या सुमारास त्याने पंख्याला गळफास घेवून आपले जीवन संपवले. सकाळी त्याचा एक मित्र त्याच्या रूमवर पोहोचला तेंव्हा ही आत्महत्या समोर आली.  सकाळी ही घटना उघडकीस आली तेंव्हा त्याच्या मित्रानाही धक्का बसला. (Pandharpur young man Commits Suicide at Paithan) यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी या घटनेची नोंद करून घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. 



प्रेमप्रकरणातून आत्महत्या !
सदर तरुणाने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केली असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. निखील याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली एक चिट्ठी पोलिसांना मिळाली असून यात 'तेरे बिना नही जिना, मर जाना ढोलना ..' अशा हिंदी गाण्याच्या ओळी लिहिल्या आहेत. (Suicide from a love affair) या चिट्ठीतील अधिक तपशील समजू शकला नाही परंतु या घटनेने अनेकांना धक्का बसला आहे.    


हे देखील वाचा : >>

  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !