BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१९ एप्रि, २०२२

शरद पवार यांच्याबाबत आता राजू शेट्टीही म्हणाले, 'पवार जातीयवादी नाहीत' !

 

✪ ✪ ब्रेकिंग ✪ ✪➤ वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या घरात पैसे मोजण्याची मशीन सापडली ! सरकारी वकिलांची न्यायालयाला माहिती ✪➤ सदावर्ते यांना उद्या न्यायालयात हजर करण्याचे न्यायालयाचे आदेश ! ✪➤ कोल्हापूरच्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी सदावर्ते यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज ✪➤ सुनावणी २१ एप्रिल रोजी होणार ! ✪

उस्मानाबाद : केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या पाठोपाठ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी देखील आज ' शरद पवार (Sharad Pawar) हे जातीयवादी नाहीत' असे सांगितले आहे. 


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेत बोलताना राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीका केली होती. यावेळी बोलताना शरद पवार हे जातीयवादी असल्याचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून जातीयवाद वाढला असल्याचे सांगितले होते. संभाजी ब्रिगेडची स्थापना राष्ट्रवादी स्थापन केल्यानंतर पवारांनी केली होती असे देखील विधान त्यांनी केले आणि त्याचा राज्यभरातून खरपूस समाचार घेतला गेला. कारण संभाजी ब्रिगेडची स्थापना ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आधी झाली आहे. मशिदीवरील भोंगे उतरविण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत असे देखील ठाकरे यांनी सांगितले होते पण प्रख्यात विधिज्ञ असीम सरोदे यांनी त्यांना खुले आव्हान दिले आणि देशातल्या कुठल्याही न्यायालयाचा असा आदेश असेल तर दाखवा' असे सांगितले. 


शरद पवार यांना जातीयवादी म्हटल्याचा मुद्दा महाराष्ट्राला पटला नाही. शरद पवार यांनी तर त्यांना जातीयवादी म्हणणाऱ्याला उदाहरणे देवून चपराक लगावली होतीच पण भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारमध्ये असलेले सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी लगेच हा मुद्दा खोडून काढत शरद पवार हे जातीयवादी नाहीत असे खडे बोल सुनावले होते. त्यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी देखील असेच मत व्यक्त केले आहे. (Raju Shetty said Sharad Pawar is not a racist) विशेष म्हणजे राजू शेट्टी हे नुकतेच महाविकास आघाडीमधून बाहेर पडलेले आहेत आणि ते पवारांचे समर्थक नाहीत तरी देखील त्यांनी जे सत्य आहे त्याबाबत खुलेपणाने भाष्य केले आहे. 


आपण गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार यांच्यासोबत काम केले आहे, साखर कारखानदारी आणि धोरण यावर शरद पवार यांच्यावर माझे आक्षेप आहेत पण पवार हे जातीयवादी किंवा धर्मवादी नाहीत असे स्पष्टपणे सांगितले आहे. राजकारणात विरोध करण्यासाठी आणि मतांचे गणित आखण्यासाठी आजवर ज्यांनी कुणी शरद पवार यांच्यावर जातीयवादाचा आरोप केला ते त्या त्या वेळी उघडे पडलेले आहेतच पण रामदास आठवले आणि राजू शेट्टी यांच्या खुलाशामुळे राज ठाकरे यांच्या आरोपाला देखील परस्पर उत्तर मिळाले आहे.  


महागाईकडे पहा !
देशात प्रत्येकजण आपला धर्म पाळतो आणि ती भारतीयांची सहज प्रवृत्ती आहे. प्रत्येक घरात देवघर असते आणि तासनतास पूजा देखील केली जाते. त्याचे प्रदर्शन किंवा जबरदस्ती करण्याची काहीच गरज नाही. जातीधर्माच्या पलीकडे जावून जनतेचे प्रश्न मांडणाऱ्याला आपले समर्थन असून जातीपेक्षा वीज, पेट्रोल, डीझेल, गॅस महागाईकडे लक्ष देण्याची गरज आहे असेही शेट्टी म्हणाले.  


आता भाजपमध्ये नाही !
महाविकास आघाडीशी संबंध तोडलेले असून ८०० शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या भारतीय जनता पक्षासोबत आपण जाणार नाही, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी वीस वर्षांपासून झगडतोय, निवडणूक दुय्यम असून शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत, ते मांडत राहणार असेही राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितले      

हे देखील वाचा :   (बातमीवर क्लिक करा )




 अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !   

  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !