बारामती : मी तिजोरीला चाव्या लावल्या तर , नाही ते ते काय घंटा देणार ? असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ( Ajit Pawar) यांनी केले आणि हे विधान पुन्हा राज्यात चर्चेचे ठरू लागले आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे स्पष्ट आणि परखड वक्तव्याबाबत प्रसिद्ध आहेत. अधिकाऱ्यांची बैठक असो की राजकीय जाहीर सभा असो, ते अंत्यत स्पष्टपणे बोलून जातात. एखादा कार्यकर्ता चुकीचे वागला तर त्याला जाहीर सभेत ते झाप झाप झापतात आणि त्याची चर्चाही होते. मनात आले की ते कुणालाच सोडत नाहीत हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. त्यांच्या अशा वेधडक बोलण्यामुळे ते अडचणीत देखील येतात. उजनी धरणाबाबत ते जाहीरपणे बोलताना सहज एक वाक्य बोलून गेले होते आणि त्यानंतर त्यांना आत्मक्लेश देखील करावा लागला होता.
अजितदादा यांच्या बोलण्याला अनेकजण वचकून असतात. पूर्वी ते बिनधास्त बोलून जात होते पण अलीकडे आपलीच गाडी घसरायला लागल्याची जाणीव त्यांना देखील लगेच होते आणि ते आवरते देखील घेत असतात. बारामती येथील एका कार्यक्रमात आज अशीच त्यांची गाडी घसरायला लागली आणि त्यांनी लगेच ती सावरलीही. पण बंदुकीची गोळी आणि बोललेला शब्द परत घेता येत नाही म्हणतात ना, अगदी तसेच झाले. त्यांच्या विधानावर जोरदार हशा पिकला (Controversial statement of Ajit Pawar) पण आपली गाडी घसरायला लागली याची जाणीव दस्तूरखुद्द अजितदादा यांनाच झाली आणि त्यांनी ते बोलून देखील दाखवले.
निंबूत येथील कार्यक्रमात आज बोलताना अजितदादांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दत्तात्रय भरणे यांना उद्देशून बोलतना एक विधान केले. 'बांधकामाच्या चाव्या त्यांच्या हातात आहेत पण त्यांना माहिती नाही, राज्याच्या तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आहेत. तीरोजीला चाव्या लावल्या तर बांधकामाला पैसे मिळतील, नाही तर ते काय घंटा देणार'? असे अजितदादा म्हणाले. अजितदादा त्यांच्या मिश्कील स्वभावामुळे नेहमीप्रमाणे सहज बोलून गेले आणि उपस्थितात जोरदार हशा देखील पिकला पण आपले हे विधान देखील वादाचे आणि चर्चेचे होऊ शकते हे त्यांच्या लगेच लक्षात आले.
आपण सहज बोलून गेलेल्या एखाद्या वाक्याचा परिणाम उलटही होण्याची भीती त्यांना वाटली असावी म्हणून त्यांनी लगेच 'गाडी घसरायला लागली, आता थांबतो' असे म्हणत आपले भाषण आवरते घेतले. अजितदादा नेहमीच आपल्या भाषणात खुमासदारपणे बोलत असतात. जेवढे आक्रमक बोलतात तेवढेच ते हलके फुलके देखील बोलतात आणि अशा बोलण्यामुळे त्यांच्या सभा गाजत असतात. कधी कधी मात्र त्यांनी केलेली विधाने त्यांच्याच अंगलट येतात. आज त्यांनी समता नागरी पतसंस्थेच्या 'समता पॅलेस' च्या उद्गाटन सोहळ्यात बोलताना असेच मिश्किल विधान केले आणि त्यांच्या या विधानाच्या देखील बातम्या तयार झाल्या.
अजितदादा म्हणाले --
'दत्तात्रय भरणे हे राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री आहेत. जिल्ह्यासाठी त्यांनी चांगला निधी आणला आहे. आमच्या बारामती तालुक्यावरही लक्ष असू द्या असे त्यांना मला सांगावे लागते. मला काही तरी द्या अशी विनंती देखील करावी लागते. बांधकामाच्या चाव्या त्यांच्या हातात आहेत पण त्यांना माहित नाही की तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहेत, त्या जर उघडल्या तर बांधकामाला पैसे मिळतील. मी तिजोरीच उघडली नाही तर त्यांना काय घंटा मिळणार ?
हे देखील वाचा :
- शेतीसाठी जूनपर्यंत मिळणार दोन आवर्तने !
- विठ्ठलभक्त माजी मुख्यमंत्र्यांना सक्तमजुरीची शिक्षा !
- अजितदादा पवार म्हणाले, 'नाही तर ते काय घंटा देणार '?
अधिक बातम्यासाठी येथे क्लिक करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !