BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२५ फेब्रु, २०२२

भाजप शहराध्याक्षाच्या घरातच जुगारीचा अड्डा !







अक्कलकोट : इतर राजकीय पक्षापेंक्षा वेगळा असल्याचे सांगणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षाच्याच घरात जुगार अड्डा चालत असल्याचा खळबळजनक प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे.


अन्य राजकीय सतत पक्षावर टीका करीत असलेल्या आणि इतरांपेक्षा वेगळेपण असल्याचे भासविणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी बेकायदा सावकारी, अवैध व्यवसाय अशा प्रकरणात अडकलेले आहेत. त्यात आता सोलापूर जिल्ह्यात देखील अशीच एक घटना पोलिसांनी उघडकीस आणून भाजप शहराध्यक्ष याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात दुधनी येथे पोलिसांनी छापा टाकला आणि येथे हा प्रकार रंगेहात सापडला आहे. 


दुधनी येथे जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानुसार पोलिसांनी माहिती मिळालेल्या ठिकाणावर धाड टाकली. भाजप शहराध्यक्ष सातलिंग उर्फ सैदप्पा परमशेट्टी याच्या घराच्या बाजूच्याच खोलीत जुगार अड्डा चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती. पोलीस जेंव्हा गेले त्यावेळी अनेकजण येथे पैशावर पैजा लावून मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याचे पोलिसांना दिसून आले. या छाप्यात ११ जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ४ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात रोख रक्कम, जुगाराचे साहित्य आणि वाहने यांचा समावेश आहे. 


पोलिसांनी कारवाई केलेल्यात भाजप शहराध्यक्ष सातलिंग उर्फ सैदप्पा परमशेट्टी, नागप्पा दत्तप्पा व्हंडारी, इष्टलिंगाप्पा श्रीशैल अमाणे, नामदेव पांडू राठोड, सय्यद हब्बूसो बळूरगी, हुसेन दस्तगीर नदाफ,  चंद्रकांत दिंडोरे, गुरुराज भीमराव उडगी, परमेश्वर सिद्धाप्पा धोत्रे, राजीव गोविंद राठोड, पुरु हरिश्चंद्र राठोड यांचा समावेश आहे. या सर्वांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्याच घरात हा अवैध प्रकार चालत असून तो उघडकीस आल्याने तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे.    


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !