मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री ईडी कोठडीत असताना नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
नबाव मलिक यांना ईडी ने अटक केल्यापासून राज्यातील वातावरण ढवळून निघाले असून महाविकास आघाडीने राज्यभर जोरदार निदर्शने करीत या अटकेचा निषेध केला आहे. ईडी न्यायालयाने नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली असून त्यांना पोटदुखीचा त्रास होऊ लागला त्यामुळे त्यांना मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मलिक यांच्या वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्यांना पुन्हा कोठडीत हलविण्यात येणार होते परंतु रुग्णालयात असतानाच मलिक यांना होणारा त्रास अधिकच वाढला त्यामुळे आणखी काही चाचण्या करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मलिक यांच्यावर उपचार केले जात असून उर्वरित चाचण्या करण्यात येत आहेत. मलिक यांना न्यायालयाच्या परवानगीनुसार कोठडीत घरचे जेवण आणि औषधे बाळगण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोठडी घेण्यापूर्वी मलिक यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती आणि त्यानंतर त्यांना कारागृहात नेण्यात आले होते. आज मात्र त्यांना पुन्हा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात नेण्यात आले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !