BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ जाने, २०२४

पोहायला गेलेल्या चार लहान मुलांचा बुडून मृत्यू ! हृदयद्रावक घटनेने गाव झाले सुन्न !

 



शोध न्यूज : राज्यातील एक वाईट घटना समोर आली असून, एकाच तलावात बुडून चार अल्पवयीन मित्रांचा मृत्यू झाला आहे, या वेदनादायी घटनेने मानवी मन हेलावून गेले आहे. खेळता खेळता हा भयानक खेळ समोर आला असून चार कुटुंबावर शोककळा पसरली आहे.


अल्पवयीन मुले खेळता खेळता भयानक संकटात सापडतात याची अनेक उदाहरणे या आधीही घडली आहेत पण या घटनेने मानवी मन सुन्न झाले आहे. उन्हाळ्यात पोहायला गेलेल्या मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू होत असल्याच्या घटना दरवर्षी घडतात, अजून उन्हाळा यायला अवकाश असतानाच, संभाजी नगरच्या वाळूज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथे ही हृदयद्रावक आणि वेदानादायी घटना घडल्याचे समोर आले आहे. एका तलावात बुडून एकाच वेळी चार अल्पवयीन मित्रांना आपला जीव गमवावा लागला आहे.  काही मित्र या तलावात पोहोण्यासाठी गेले असता ही दुर्घटना घडली आहे.  काही मुलं पोहोण्यासाठी या तलावात उतरली पण यातील चार मुले बुडून मृत्युमुखी पडली आहेत. तलावात पोहोण्यासाठी उतरल्यानंतर त्यांना तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने ही मोठी घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.  


पोहोण्यासाठी गेलेले  बिस्वजित सुखदेव उपाध्याय कुमार (वय 12), अफरोज जावेद शेख (वय 12), जावेद शेख (वय 14), अबरार जावेद शेख (वय 12) हे चार मित्र या तलावात मृत्युमुखी पडले आहेत. या घटनेची माहिती नागरिकांना मिळताच त्यांनी तलावाकडे धाव घेतली, काही वेळेत स्थानिक पोलीस देखील या ठिकाणी पोहोचले. अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी या चारही मुलांना पाण्याच्या बाहेर काढले परंतु तो पर्यंत या चौघांचाही बुडून मृत्यू झाला होता. (Four children who went swimming drowned)  यामुळे त्यांच्या कुटुंबियांसह संपूर्ण गावावर देखील शोककळा पसरली आहे. लहान मुलांचे मृतदेह पाहून त्यांच्या कुटुंबाने अक्षरश: हंबरडा फोडला. आकांत आणि आक्रोश यामुळे परिसरातील वातावरण देखील सुन्न होऊन गेले होते. 


सदर अल्पवयीन मुले खेळण्यासाठी म्हणून घराबाहेर पडली होती. संध्याकाळ झाली ती मुले घरी कशी परत आलेली नाहीत म्हणून कुटुंब काळजी करीत होते. कुटुंबातील काही सदस्य आणि नातेवाईक यांनी मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. हा शोध तलावापर्यंत जाऊन पोहोचला. यावेळी तलावाच्या काठावर मुलांचे कपडे दिसून आले. चारही मुलांचे कपडे आहेत पण सदर मुले कुठेच दिसत नाहीत त्यामुळे शंकेची पाल चुकचुकली. नातेवाईकानी लगेच याबाबत अग्निशामक दलाला याची माहिती दिली. पोलिसांना तसेच गावात देखील याची माहिती कळविण्यात आली. अग्निशामक दलाने लगेच आपले काम सुरु केले. काही वेळच्या शोधकार्यानंतर चारही मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मात्र कुटुंब आणि गावकरी शोकात बुडाले. लहानग्यांचे मृतदेह पाहून त्यांच्या कुटुंबीयांनी तर हंबरडा फोडला. या घटनेने अवघे गाव सुन्न झाले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !