BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२३ जाने, २०२४

ग्रामसेवकांसह तिघे जण आले गोत्यात .... सात हजार रुपयांसाठी तोंडाला सुटले होते पाणी !



शोध न्यूज : फुकटच्या सात हजार रुपयासाठी आधी तोंडाला सुटले पाणी आणि पुन्हा पडली घशाला कोरड ! असा प्रकार एका ग्रामसेवकासह तिघांना अनुभवयाला मिळाला असून मोहोळ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


शासकीय सेवकांना पगारापेक्षा फुकटच्या पैशाचा मोह अधिक असल्याचे नेहमीच अनुभवाला येत असते. सरकार भलामोठ्ठा पगार देत असले तरी लाचेशिवाय यांची  भूक भागत नाही हे अनेकदा दिसते. वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यापासून शिपायापर्यंत अनेक  लाचखोर तुरुंगात जाऊन बसले आहेत. तरी देखील लाचखोर शुद्धीवर येत नाहीत, उलट लाचखोरीचा प्रकार अलीकडे थेट गावपातळीवर पोहोचला आहे. सरपंच, ग्रामसेवक देखील लाच मागतात आणि ती घेतात. असे काही प्रकार उघडकीस देखील आलेले आहेत. काही ग्रामसेवक लाच घेताना रंगेहात पकडले असतानाच आता पुन्हा सोलापूर जिल्यात असाच एक प्रकार समोर आलेला आहे. ग्रामसेवक आणि अन्य दोघांच्या विरोधात सात हजार रुपयांच्या लाच प्रकरणी मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  संतोषकुमार नाथनाथ वाघ (३७, ग्रामसेवक, चिंचोली काटी ग्रामपंचायत, रा. गवत्या मारुती चौक, मोहोळ), परशुराम रवींद्र पाटोळे (वय- ३५, सेवक, कंत्राटी, रा. चिंचोली काटी), सुधीर लांडगे (वय- ४८, खासगी इसम, रा. सावळेश्वर ता. मोहोळ), यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे.


घर बांधकामास कर्ज घेण्यासाठी,  आवश्यक असलेला गावठाण परवाना मिळवण्यासाठी ग्रामसेवकाच्या वतीने ७ हजार रुपये लाचेची रक्कम खासगी इसम, कंत्राटी सेवकामार्फत स्वीकारल्याप्रकरणी चिंचोली काटीचे ग्रामसेवक अशा तिघांवर मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. लाचलुचपत विभागाच्या पथकाकडून सापळा लावून सोमवारी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात  तक्रारदारांनी घर बांधणीसाठी खासगी फायनान्सकडून कर्ज मिळवण्यासाठी अर्ज केला होता. कर्जमंजुरीसाठी ग्रामपंचायतीतील गावठाण प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामसेवकाची भेट घेतली. हे प्रमाणपत्र देण्यासाठी ग्रामसेवकाने  १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी तक्रारदार यांच्याकडे केली. ही लाच देणे मान्य नसल्यामुळे सदर तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करून तक्रार दाखल केली. 


या तक्रारीची सदर विभागाकडून पडताळणी करण्यात आली. यात लाचेची मागणी केली असल्याचे दिसून आले.  ग्रामसेवकाकडून तक्रारदाराला सेवकाला भेटण्यास सांगण्यात आले. त्यानेही  ग्रामसेवकामार्फत ७ हजार रुपयांची मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. (A case has been registered against three people in bribery case) पडताळणी झाल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आपल्या पद्धतीने सापळा लावला आणि खाजगी व्यक्तीच्या मार्फत लाचेची सात हजाराची रक्कम स्वीकारताना रंगेहात कारवाई करण्यात आली. त्यानंतर ग्रामसेवक संतोषकुमार वाघ याच्यासह कंत्राटी सेवक परशुराम पाटोळे, खाजगी व्यक्ती सुधीर लांडगे या तिघांच्या विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !