BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ फेब्रु, २०२२

राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना समन्स !

 



पुणे : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आयोगाने समन्स जारी केले असून आयोगापुढे शरद पवार यांची साक्ष घेण्यात येणार आहे. 


भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चौकशी आयोगाची नेमणूक केली आहे. न्यायमूर्ती जे. एन. पटेल  यांच्या अध्यक्षतेखाली या हिंसाचाराची चौकशी करण्यात येत आहे. १ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव येथे हिंसाचार उसळला होता. याप्रकरणी साक्ष देण्यासाठी शरद पवार यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. येत्या २३ फेब्रुवारी रोजी शरद पवार यांची साक्ष होणार आहे. त्यासाठी पवार यांना आयोगाने समन्स पाठवले आहे.


भीमा कोरेगाव येथे हिंसाचार उसळला होता त्यावेळी शरद पवार यांनी संभाजी भिडे यांना जबाबदार धरले होते. भिडे यांच्या वक्तव्यामुळे हिंसाचार भडकला होता असे विधान शरद पवार यांनी केले होते. त्यामुळे एड. प्रदीप गावडे यांनी या प्रकरणात शरद पवार यांची साक्ष घेतली जावी अशी मागणी आयोगाकडे केली होती. त्यानुसार आयोगाने आता शरद पवार याना साक्षीसाठी बोलावले आहे.  पवार यांच्यासह पुण्याच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांना आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त यांनाही समन्स जारी करण्यात आले आहे. त्यावेळी पुण्याचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक हे होते तर अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर हे होते. या दोघांनाही आयोगाने समन्स पाठवले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !