मराठा आरक्षण मिळावे म्हणून आजवर अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. अजूनही आत्महत्या थांबायचे नाव घेत नसून आता पुन्हा नांदेड आणि बीड जिल्ह्यात अशा अप्रिय घटना घडल्याचे समोर आले आहे. मला मराठा आरक्षणासाठी क्रांती घडवायची आहे असे म्हणत नांदेड वाघाळा परिसरातील साईनाथ टरके या ३२ वर्षे वयाच्या मराठा तरुणाने, आपल्याच घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. 'मी मराठा आरक्षण क्रांतीसाठी जीवन संपवत आहे. एक मराठा, लाख मराठा' असे लिहिलेली एक चिट्ठी देखील त्याच्या खिशात सापडली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शेकडो कार्यकर्ते रुग्णालयात पोहोचले होते. जमलेल्या मराठा कार्यकर्त्यांनी यावेळी मोठी हळहळ व्यक्त केली.
बीड जिल्ह्यातील मोरगाव येथे घडलेल्या दुसऱ्या घटनेत, ५३ वर्षीय मराठा बांधवाने मराठा आरक्षणासाठी प्राण त्याग केला आहे, मराठा आरक्षण लढ्यात नेहमी पुढे असणारे श्रीमंत भगवान जोगदंड (वानगाव ) यांनी गळफास घेवून आत्महत्या केली आहे. (Two more lives for Maratha reservation ) या घटनेने मराठा समाजाला मोठा धक्का बसला असून, त्यांच्या खिशात 'मराठा आरक्षण, 'एक मराठा, लाख मराठा' असा मजकूर असलेली चिट्ठी आढळून आलेली आहे. या दोन्ही घटनांनी मराठा बांधव पुन्हा एकदा हादरून गेले असून, आत्महत्या हा काही आरक्षणाचा मार्ग नाही, त्यामुळे तरुणांनी अशा प्रकारे टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन देखील करण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !