BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२३ जाने, २०२४

भीमा नदीत बुडून सोलापूर जिल्ह्यात दोघांचा मृत्यू !

 


शोध न्यूज : भीमा नदीच्या पात्रात बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोलापूर जिल्ह्यात घडली असून, दोन वेगवेगळ्या घटनात दोघांचाही मृत्यू झाला आहे. दोन्ही घटना मंगळवेढा तालुक्यात घडल्या आहेत.


मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथे जटाशंकर मंदिर हे नदीच्या पात्रात आहे आणि येथे भाविकांची नेहमी गर्दी होत असते. येथील सिद्धेश्वर मंदिर देखील प्रसिद्ध आहे. मध्य प्रदेशातील कोसमी येथील २५ वर्षे वयाचा तरुण अर्जुन बिजेराम धुर्वे हा येथील सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेला होता. येथे दर्शन घेतल्यानंतर तो नदीच्या पात्रात असलेल्या श्री जटाशंकर मंदिरात दर्शन घेण्यासाठी निघाला. (Two died by drowning in Bhima river) पात्रात असलेल्या पाण्यातून पोहत तो मंदिराकडे निघाला असता, याच पाण्यात त्याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची नोंद मंगळवेढा पोलिसात झाली असून दीपक धुर्वे यांनी याबाबतची खबर पोलिसांना दिली आहे. 


मंगळवेढा तालुक्यातच आणखी एक अशीच घटना घडली आहे. उचेठाण येथील नदीच्या पात्रात असलेल्या बंधाऱ्यात बुडून ३७ वर्षीय युवराज गोपीनाथ धुमाळ यांचा मृत्यू झाला आहे. धुमाळ हे मंगळवेढा येथीलखंडोबा गल्लीतील रहिवाशी आहेत. धुमाळ हे पाण्यात बुडत असल्याची घटना तेथे मासेमारी करणाऱ्या काही लोकांनी पाहिली. त्यांनी तातडीने धाव घेत धुमाळ यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मासेमारी करणाऱ्या लोकांनी त्यांना नदीच्या पात्रातून बाहेर काढले आणि रुग्णवाहिकेला बोलावून घेत, त्यांना मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. धुमाळ यांना वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न  करण्यात आले परंतु मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांना वाचविण्यात अपयश आले. या घटनेबाबत देखील मंगळवेढा  पोलिसात खबर देण्यात आली आहे. भीमा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू होण्याच्या घटना नेहमीच घडत असून, अशा घटनापासून बोध घेऊन, नदीच्या पात्रात उतरण्यापूर्वी विचार करण्याची आवश्यकता आहे.


.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !