BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२२ नोव्हें, २०२३

सांगोल्याच्या एस टी. ने उडवली सात वाहने ! अचानक ब्रेक फेल झाला आणि --

 


शोध न्यूज : सांगोला येथील एका एस टी बसने पुण्यात सात वाहने उडवली असून, ब्रेक फेल झाल्यामुळे हा मोठा अपघात घडल्याचे समोर आले आहे.


राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे अपघात वरचेवर वाढत असून, यातील बहुतेक अपघात हे जुन्या झालेल्या आणि पुरेशी देखभाल नसलेल्या बसमुळे होत असल्याचे दिसत आहे. ब्रेक फेल होणे, स्टेअरिंग तुटणे, टायर फुटणे अशा प्रकारच्या कारणांचा या अपघातात समावेश आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी आणि सुरक्षित प्रवास असे सांगणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे अपघात अधिक प्रमाणात होत आहेत. तरी देखील  महामंडळ याकडे गंभीरपणे पहात नसलायचे दिसत आहे. (ST Bus brake failure and accident) आता पुन्हा पुण्यात असाच एक मोठा अपघात झाला आणि यात अनेकांचे जीव धोक्यात आले. भरधाव वेगाने जाणाऱ्या एस टी बस चे ब्रेक निकामी झाले आणि या बसने रस्त्यावरील सात वाहने उडवली आहेत.


पुण्यातील फातिमा नगर येथे ही घटना घडली असून यात सहा जण जखमी झाले आहेत. संगोल्याची ही बस भरधाव वेगाने जात असताना अचानक ब्रेक फेल झाले त्यामुळे रस्त्यावरील वाहने उडवत ही बस पुढे जात राहिली. ब्रेक निकामी झाल्याने चालकाच्या हाती काहीच उरले नाही त्यामुळे अपघात होत राहिले. काल रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे आणि यात सहा जन जखमी असून एका आठ वर्षाच्या मुलाचाही या जखमीत समावेश आहे. या घटनेने फातिमा नगर परिसरात एकच खळबळ उडाली आणि लोकात घबराट देखील पसरली.  सांगोला येथील ही बस पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकाकडे निघाली होती. यावेळी फातिमा नगर येथील काळूबाई मंदिर चौक परिसरात ब्रेक निकामी झाले त्यामुळे दोन मोटारीसह पाच दुचाकीला या बसने धडक दिली. सदर बसमधून एकूण ३० प्रवाशी प्रवास करीत होते. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.  पोलिसांनी या अपघात प्रकरणी सांगोला येथील बसचालक चंद्रशेखर स्वामी यांना ताब्यात घेतले आहे.  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !