BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ नोव्हें, २०२३

मराठ्यांना मिळणार नाही सरसकट आरक्षण ! आता पुढे काय ?

 



शोध न्यूज :  मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार नसून ती केवळ एक अफवा आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच स्पष्ट केले असून आता मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील पुढे काय भूमिका घेणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.


मराठा आरक्षण मिळण्यासाठी मराठा बांधव सातत्याने प्रयत्न करीत आहेत, मनोज जरांगे पाटील यांनी तर आंतरवाली सराटी येथे उपोषण करीत आपला जीव डावावर लावला आहे, संपूर्ण महाराष्ट्र मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांनी व्यापला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी केवळ सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी केलेली आहे आणि त्यावर सरकारने वाटाघाटी करून, त्यांचे उपोषण काही दिवसापुरते स्थगित करण्यात यश मिळवले आहे. कुणबी नोंद  असलेल्या मराठा बांधवाना कुणबी प्रमाणपत्र दिले जात असून, आणखी नोंदींचा शोध प्रशासन घेत आहे. दरम्यान ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी आता सरकारच्या विरोधात बोलणे सुरु केल्याने राजकारण देखील ढवळून निघाले आहे. सरसकट मराठा आरक्षण देण्यास भुजबळ आणि काही नेत्यांनी विरोध केला आहे पण आता मुख्यमंत्र्यांनीच याबाबत स्पष्टीकरण दिले असल्यामुळे, सर्व मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही असेच दिसू लागले आहे.


मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार असल्याची ही केवळ अफवा आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. शिवाय या प्रकरणी ओबीसीने संभ्रम बाळगू नये असे देखील त्यांनी म्हटले आहे त्यामुळे मराठा समाजाला एक मोठा धक्का बसलेला असून आता मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेताहेत याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मराठा समाज आपले आंदोलन आणखी तीव्र करेल की काय अशी परिस्थिती आता यामुळे निर्माण होण्याची शक्यता आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या या वक्तव्याच्या संदर्भात मनोज जरांगे पाटील हे पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका आजच स्पष्ट करणार आहेत पण, मराठा समाजाची मोठी फसवणूक होण्याची शक्यता असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे ही तर जरांगे पाटील यांची मुख्य मागणी आहे, अर्धवट आरक्षण घेणार नाही असे त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितले आहे आणि राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून त्यांनी उपोषण स्थगित केलेले आहे.


छगन भुजबळ यांनी सरसकट आरक्षण देण्यास विरोध केला आहे आणि मंत्रीमंडळ बैठकीत देखील याचे पडसाद उमटले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी यावर भाष्य केले आहे. मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्याच्या अफवेमुळे संभ्रम निर्माण झाला होता. पण, तो आता दूर करण्यात आला आहे. ओबीसी समाजाने मनामध्ये कोणताही संभ्रम ठेवू नये, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. भुजबळ आणि ओबीसी नेत्यांच्या मनातील संभ्रम आपण दूर केला असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. या एकंदर वक्तव्यामुळे मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळणार नाही हेच स्पष्ट होत आहे, त्यामुळे मराठा समाजात पुन्हा अस्वस्थता पसरली आहे. साहजिकच हे आंदोलन पुन्हा जोर धरण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यासंदर्भात मनोज जरांगे पाटील हे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावरून राजकारण देखील पेटण्याची शक्यता आहे. (Marathas will not get outright reservation) दरम्यान मनोज जरांगे पाटील हे १५ नोव्हेंबर पासून महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत शिवाय त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक गावात साखळी उपोषण सुरु करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. राज्यातील एक गावही साखळी उपोषणाशिवाय राहू नये असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.  




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !