BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ नोव्हें, २०२३

कार्तिकी एकादाशीची पूजा मनोज जरांगे यांच्याच हस्ते -------





शोध न्यूज : कार्तिकी यात्रेच्या विठ्ठल रुक्मिणी महापुजेबाबत पेच निर्माण झाला असताना, ही पूजा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याच हस्ते करण्यात यावी अशी आग्रही मागणी पुढे आली आहे. (Vitthal Mahapuja ) त्यानंतर जनतेतून देखील या मागणीला समर्थन मिळू लागल्याचे दिसत आहे. 


मराठा आरक्षणाचे आंदोलन भडकल्यापासून राज्यभरातील वातावरण पूर्ण बदलून गेले आहे, मराठा आंदोलकांनी राजकीय नेत्यांना गावबंदी केली असून, राज्यात कुठेही हे नेते, मंत्री, आमदार, खासदार गेले तर, त्यांना मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे राजकीय मंडळीनी दौरे करणे जवळपास बंद केले आहे. अशाच परिस्थितीत कार्तिकी एकादशीच्या ( kartiki ekadashi) महापुजेला, उपमुख्यमंत्री यांनी येवू नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे. कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा दरवर्षी उप मुख्यमंत्री यांच्या हस्ते होत असते. यावेळी मात्र मराठा आंदोलक आक्रमक असून, त्यांनी मंदिर समितीला देखील इशारा दिला आहे. समितीने कोणत्याही उप मुख्यमंत्र्यांना पूजेचे निमंत्रण देवू नये असे बजावले आहे. उप मुख्यमंत्री आले तर त्यांच्या तोंडाला काळे फासू आणि त्यांना मंदिर समितीने निमंत्रण दिले तर समिती अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल असा इशाराच मराठा आंदोलकांनी दिलेला आहे.


मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कार्तिकी एकादशीची महापूजा कुणाच्या हस्ते करायची हा पेच निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री नाही आले तर एखाद्या वारकऱ्यांच्या हस्ते करण्याचा पर्याय असतो. परंतु आता मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी दुसरी मागणी केली आहे. कार्तिकी एकादशीची महापूजा ही मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते करण्यात यावी अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे. या मागणीचा मंदिर समिती किती विचार करतेय हे पाहावे लागणार आहे. मराठा आंदोलक मंदिर समितीच्या बैठकीत घुसले होते आणि त्यांनी जोरदार घोषणाही दिल्या होत्या. त्यावेळी, मराठा आंदोलकांच्या भावना शासनाकडे पोहोच करू असे समितीच्या वतीने सांगण्यात आले होते, दरम्यान राज्य शासनाचा विधी व न्याय विभाग काय निर्णय घेतोय हे पाहणे देखील तितकेच महत्वाचे आहे.


यापूर्वी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना असाच पेच निर्माण झाला होता. २०१८ साली आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी ते येणार होते पण मराठा आंदोलकांनी त्यांना न येण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून फडणवीस यांनी पूजेला न येण्याचा निर्णय घेतला होता आणि वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानीच त्यांनी विठ्ठलाची पूजा केली होती. (Kartiki Ekadashi Pooja Manoj Jarange) यावेळी अजित पवार अथवा देवेंद्र फडणवीस पोलीस बळाचा वापर करून आले तर मागच्या पेक्षाही अधिक उग्र आंदोलन करू असा रोखठोक इशारा मराठा क्रांती  मोर्चाने दिला आहे. त्यामुळे यावर्षी कार्तिकी यात्रेत नक्की काय घडतेय हे पहावे लागणार आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !