BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ नोव्हें, २०२३

शोध मोहीम राबवताच कुणबी मराठा नोंदी सापडू लागल्या !

 



शोध न्यूज : राज्यात विविध जिल्ह्यात कुणबी मराठा नोंदी सापडत असून पंढरपूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातही अशा नोंदी आढळून आल्या असून, तशी प्रमाणपत्रे देण्यास सुरुवातही झाली आहे. कुणबी मराठ्याचे मोठे पुरावे पुरातन कागदात आढळून येवू लागले आहेत. 


मराठा आरक्षण मागणीने जोर धरला असून, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी नेटाने प्रयत्न सुरु ठेवले असून, राज्यातील मराठा आणि अन्य समाजही त्यांच्या आंदोलनासोबत उभा आहे. यामुळे सरकारलाही झुकावे लागले असून, कुणबी नोंदी तपासण्याचे काम वेगाने सुरु झाले आहे. राज्यभर या नोंदी तपासण्याचे आदेश शासनाने दिले असून, त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्या तालुक्यात या नोंदी तपासण्याचे काम गतिमान झाले आहे. ज्यांच्या नोंदी सापडत आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जात आहे. (Kunbi Maratha records found in Solapur district)  हे मराठा आंदोलनाचे मोठे यश असून, आजवर कसा अन्याय झाला याचेच हे बोलके उदाहरण ठरू लागले आहे. प्रत्येक तालुक्यात अशा नोंदी आढळून येवू लागल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातही अशा नोंदी मिळू लागल्या असून, काहीना प्रमाणपत्र देण्याचे काम देखील प्रशासकीय पातळीवरून सुरु झाले आहे. 


कुणबी नोंदी (Kunabi Maratha ) तपासण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तालुका अन् गावपातळीवर समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. शंभर ते पंचाहत्तर वर्षांपूर्वीच्या नोंदी  तपासण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मोडी लिपी, पारशी तसेच उर्दू भाषेचे अभ्यासक तसेच अनुवादक हवे आहेत. सोलापूर  जिल्ह्यात काही मोडी लिपीच्या नोंदी , सापडल्या असून मोडी, उर्दू, फारशी अशा भाषेतील नोंदी देखील सापडल्या जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या नोंदींचा मराठी अनुवाद करण्याच्या हेतूने त्या त्या भाषेच्या अभ्यासकांशी प्रशासन संपर्क करीत आहे. दरम्यान  सोलापूर जिल्ह्यात आधीच साडे आठशेपेक्षा अधिक कुणबी दाखल्यांचे वाटप करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात ८७५ जणांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. माढा तालुक्यात २४२, बार्शी तालुका - ११, अक्कलकोट तालुका - ९, उत्तर सोलापूर - ३ पंढरपूर तालुका - २, सांगोला- १  आणि माळशिरस तालुक्यात ८ कुणबी प्रमाणपत्रांचे वितरण केले गेले आहे.


पंढरपुरात शेकडो नोंदी !

पंढरपूर तालुक्यातही कुणबी नोंदी तपासणीचे काम वेगाने हाती घेण्यात आले असून, आत्तापर्यंत पाच गावात ४७९ नोंदी आढळून आल्या आहेत. पंढरपूर तालुक्यातील तावशी येथे १ अजनसोंड येथे 3 भोसे येथे २४९, भाळवणी येथे ५० तर कासेगाव येथे १७६ अशा एकूण ४७९ कुणबी अशा नोंदी आढळून आल्या आहेत. जुनी कागदपत्री तपासणीचे काम हाती घेण्यात आले असून, त्यामुळे या जुन्या नोंदी हातात येत आहेत.  आणखी नोंदी सापडण्याची शक्यता असून, प्रशासकीय पातळीवर वेगाने हे काम हाती घेण्यात आले आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !