BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

६ नोव्हें, २०२३

राज्यात कोसळणार मुसळधार ! 'या' जिल्ह्यांना बसणार तडाखा !!



शोध न्यूज : हिवाळा सुरु झाला असला तरी, मुसळधार पाऊस होणार असल्याचा हवामान अंदाज येत असून आता हवामान विभागाने राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.


मे महिन्यापासून शेतकरी पावसाची वाट पहात राहिला, पावसाळा संपला पण पाऊस काही आलाच नाही, बळीराजाचे डोळे शिणले पण आभाळातून पाणी बरसलेच नाही, पावसाने निरोप घेतल्यानंतर सगळ्यांनीच या न येणाऱ्या पावसाची आशा सोडून दिली आणि हिवाळ्याच्या थंडीचा अनुभव घेणे सुरु केले. आता ऐन थंडीच्या दिवसात राज्याच्या काही भागात पाऊस होत असून, मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. मान्सूनचा पाऊस तर परत गेला आहे आणि थंडीची चाहूल लागली आहे. पर्यायाने तापमानात घट झाली असून, काही जिल्ह्यात थंडी झोंबू लागली आहे. कुठे उकाडा तर  कुठे गारठा अशी परिस्थिती दिसत आहे. कुठे शेकोट्या पेटू लागल्या आहेत. खरीपाची पिके काढणीला आली असल्यामुळे शेतीच्या कामालाही वेग आलेला आहे आणि इकडे हवामान विभाग पावसाचा अंदाज व्यक्त करीत आहे.


हवामान विभागाने देशासह महाराष्ट्रात पाऊस होणार असल्याचे सांगितले आहे. या अंदाजानुसार राज्यातील काही जिल्ह्यात हा मुसळधार पाऊस बरसणार आहे.  सदर अंदाजानुसार, कोकणासह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आज हलका ते मुसळधार पाउस होईल आणि काही जिल्ह्यात आजचे वातावरण दिवसभरासाठी ढगाळ राहील असे सांगण्यात आले आहे. या व्यतिरिक्त सांगली, कोल्हापूर आणि सिधुदुर्ग या जिल्ह्यासाठी देखील पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. मुंबई, पुणे. ठाणे, कोकण किनारा येथे सद्या संमिश्र हवामान दिसत आहे. सकाळच्या वेळेस थंडी तर दुपारच्या वेळी उन्हाचा कडका असे वातावरण आहे.   


राज्याच्या विविध भागात आज मुसळधार पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करतानाच, हवामान विभागाने केरळला देखील इशारा दिला आहे. (Heavy rain will fall in Maharashtra today) आज केरळच्या काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. या पावसाचा विचार करता, शेतकरी बांधवांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी असे आवाहन देखील हवामान विभागाने केले आहे, मोसमी पावसाने पाठ फिरविल्यानंतर आता पुन्हा या पावसाचे अंदाज व्यक्त होऊ लागले आहेत. कुठे हा पाऊस उपयुक्त मानला जात आहे तर कुठे शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा ठरू लागला आहे. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !