BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

४ नोव्हें, २०२३

बारावीच्या परीक्षेतही 'एक मराठा, कोटी मराठा' !



शोध न्यूज : मराठा आरक्षणाची गुंज राज्यभर वाजत गाजत असताना, बारावीच्या परीक्षेत देखील सोलापूर जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याने 'एक मराठा, कोटी मराठा' चा आवाज केला आहे. या विद्यार्थ्याही ही उत्तरपत्रिका आता सोशल मीडियावर देखील व्हायरल होऊ लागली आहे. 


मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी नव्याने मराठा आरक्षणाचा विषय उचलून धरला आणि पाहता पाहता अवघा महाराष्ट्र त्यांच्या पाठीमागे उभा राहिला. राज्यातील गावोगावी या आंदोलनाचे पडसाद उमटू लागले आणि 'एक मराठा, लाख मराठा' या घोषणेने राज्यातील आणि केंद्रातील सरकार हादरून गेले. दुर्दैवाने काही तरुणांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या देखील केल्या आहेत. मराठा आंदोलन घराघरात पोहोचले आणि सरकारला झुकावे लागले. हे आंदोलन केवळ घराघरापर्यंत नव्हे तर ज्याच्या त्याच्या मनामनापर्यंत पोहोचले आहे. यासोबत हे आंदोलन आता शाळेत आणि बारावी सारख्या महत्वाच्या परीक्षेत देखील पोहोचले असल्याचे, सोलापूर जिल्ह्यात दिसून आले आहे.


उत्तर सोलापूर तालुक्यातील बी बी दारफळ येथील एका विद्यार्थ्याने बारावीच्या सहामाही परीक्षेत मराठा एकजुटीचा संदेश दिला आहे. बारावी सहामाही परीक्षेतील राज्यशास्त्र या विषयाची परीक्षा देताना, संकेत लक्ष्मण साखरे या १९ वर्षीय विद्यार्थ्याने, उत्तरपत्रिका लिहिण्याची सुरुवातच वेगळ्या पद्धतीने केली आहे. 'एक मराठा,  कोटी मराठा' असे मोठ्या अक्षरात लिहून त्याने पुढील पेपर लिहिला आहे.  बी.बी. दारफळ येथील आदर्श शिक्षण मंडळ बीबीदारफळ प्रसारक संचलित, श्री गणेश विद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयात संकेत लक्ष्मण साखरे हा विद्यार्थी बारावीत शिकत आहे. पेपरची सुरुवातच त्याने ‘जय जिजाऊ, जय शिवराय,' 'जय शंभुराजे,' एक मराठा, कोटी मराठा’ असे लिहून केली. त्याची उत्तरपत्रिका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागली आहे. 


संकेत साखरे हा विद्यार्थी सोलापूरच्या लोकमंगल डिस्टलरी या प्रकल्पात कामगार म्हणून काम करीत आहे पण तरीही शिक्षण घेत आहे. त्याच्या वडिलांचे २००८ साली निधन झाले असून कुटुंबात आई आणि भाऊ आहे. त्याने सुरुवातीला आयटीआयचे शिक्षण घेतले आणि तो कामगार म्हणून काम करू लागला. पुढे शिकण्याची इच्छा असल्यामुळे त्याने काम करीत शिक्षण घेणे सुरु ठेवले आहे. ('One Maratha, crore Marathas' in class 12th exam) चांगले मार्क मिळवले तरी मराठा तरुणांना चांगली नोकरी मिळू शकत नाही, शेतीमालाला बाजारात किंमत नाही आणि शेतीच्या उत्पादन देखील शाश्वत नाही, त्यामुळे शेती असूनही पोटासाठी काही ना काही काम करण्याशिवाय पर्याय नाही, अशा वेळी मराठा आरक्षण मिळाले तरच मराठा तरुणाचे काही भले होऊ शकते असे त्याने म्हटले आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !