BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

४ नोव्हें, २०२३

निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशीच उमेदवारांचा दुर्दैवी मृत्यू !




शोध न्यूज : सोलापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम जोरात सुरु असतानाच प्रत्यक्ष मतदान होण्याआधीच एका उमेदवारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ग्रामपंचायत सदस्य होण्याचे स्वप्नं अपुरे राहिले आहे.


राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा धुरळा चांगलाच उडाला असून, रविवारी या निवडणुकीचे प्रत्यक्ष मतदान होत आहे. गेल्या आठवड्यापासून गावोगाव या निवडणुकीची रणधुमाळी भलतीच वेगवान झाली होती तर काल रात्रीपासून उमेदवारांनी रात्री देखील जागून काढल्या आहेत. गावागावात अत्यंत चुरशीने ही निवडणूक होत असून, उद्या रविवारी या उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात कैद होणार आहे त्यामुळे अनेकांची धाकधूक वाढलेली आहे. या सगळ्या धामधुमीत सोलापूर जिल्ह्यातून एक वाईट घटना समोर आली आहे, ग्रामपंचायत निवडणूक लढवत असलेल्या एका उमेदवाराचा मतदानाच्या आधीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे येथील निवडणूक रद्द करावी लागली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील चिकमहुद तळेवाडी येथील ६५ वर्षाचे उमेदवार किसन सोपान यादव यांचा मृत्यू झाला आहे. 


मयत उमेदवार किसन सोपान यादव हे ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य पदासाठी निवडणूक लढवत होते. यादव हे चिकमहुद ग्रामपंचायत निवडणुकीतील सदस्यपदासाठी प्रभाग क्रमांक ५ मधील अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव असलेल्या सदस्य पदासाठी उभे होते. या निवडणुकीसाठी त्यांनी आपला प्रचार देखील केला होता. यादव हे शेतात शेळ्या राखण्यासाठी गेलेले असताना, त्यांना हृदयविकासाचा झटका आला. शेजारच्या शेतात काम करीत असलेल्या काही महिलांनी हे पाहिले आणि त्यांनी तातडीने, यादव यांच्या कुटुंबाला याची माहिती दिली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले परंतु, तत्पूर्वीच त्यांचा  मृत्यू झाला होता. या घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात आली. रविवारी मतदान असताना, शुक्रवारीच त्यांची प्राणज्योत मालवली त्यामुळे दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निधनामुळे, ते लढत असलेल्या एका जागेची निवडणूक रद्द करण्यात आली आहे.


प्रचाराच्या शेवटच्या दिवशीच किसन सोपान यादव या उमेदवारांचा मृत्यू झाला त्यामुळे निवडणूक प्रक्रिया थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या जागेवरची निवडणूकही रद्द करण्यात आली आहे. (Candidates died on the last day of election campaign) यादव यांच्यावर जड मनाने अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने गाव आणि परिसर देखील हळहळ व्यक्त करीत आहे.  यादव यांना ग्रामपंचायत सदस्य व्हायचे होते पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते.

 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !