BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३० जून, २०२२

लहान मुलासह आईची जाळून घेवून आत्महत्या !



करमाळा : अवघ्या तीन वर्षे वयाच्या मुलासह तरुण मातेने जाळून घेवून शेतात आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब करमाळा तालुक्यात समोर आली असून या घटनेने करमाळा तालुकाच नव्हे तर सोलापूर जिल्हा देखील हादरला आहे.


करमाळा तालुक्यातील गौंडरे गावाच्या शेत शिवारात ही अत्यंत धक्कादायक असलेली घटना घडली आहे.  बावीस वर्षे वयाच्या संध्या दत्तात्रय आंबारे या मातेने आपल्या तीन वर्षे वयाच्या शंभू दत्तात्रय अंबारे या आपल्या मुलासह पेटवून घेवून आत्महत्या केली असल्याचे समोर आले. संध्या यांचे पती दत्तात्रय हे गवंडी काम करीत आहेत. त्यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या शेतात ही घटना घडली आहे. सदरची घटना उघडकीस आली तेंव्हा परिसरात आणि तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली. आत्महत्येच्या या घटनेमागे नेमके काय कारण आहे हे लगेच समजू शकले नाही परंतु घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पुढील कार्यवाही सुरु केली. 


पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेवून शवचिकित्सेसाठी पाठविले असून या घटनेबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. (Suicide by burning mother with small child) पोलिसांच्या तपासानंतर या घटनेमागील कारण प्रकाशात येणार आहे परंतु या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मातेचे वय केवळ २२ वर्षाचे तर लहान मुलाचे वय केवळ ३ वर्षाचे असल्याने अधिक हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.    




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !