BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३० जून, २०२२

सरकार पाडताच बच्चू कडू यांना मोठी क्लिन चीट !

 



मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार पाडताच तीन रस्त्यांच्या कामात गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणातून बच्चू कडू यांना क्लिन चीट मिळाली असून आणखी काही जण प्रतीक्षेत आहेत. 


महाविकास आघाडी सरकार राज्यात आल्यापासून ईडी, सीबीआय, आयकर अशा विविध केंद्रीय यंत्रणांचा वावर राज्यात मोठ्या प्रमाणात वाढला होता. राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक या जेष्ठ मंत्र्यांना अटक करण्यात आली आहे तर महाविकास आघाडीच्या अनेक नेते आणि मंत्री यांच्या चौकशा सुरूच आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा केवळ विरोधकांच्याच नेत्यावर कारवाई करतात आणि राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करतात असे आरोप सतत होत आले आहेत आणि आता राज्य सरकार खाली खेचण्यात यश देखील आले आहे. हा सर्व प्रकार ईडी करावयाच्या धमक्या देत झाला असल्याचे देखील आरोप सर्वत्र होत आहेत. शिवसेनेच्या काही बंडखोर मंत्र्यांच्या भोवती देखील इडी चौकशीचे वादळ घोंघावत असल्याचे दिसत होते. हे मंत्री या भीतीनेच बंडखोरीच्या दिशेने गेल्याचे आरोपही यापूर्वीच करण्यात आले आहेत.

 
भाजपात प्रवेश केला की क्लिन चीट मिळते आणि कारवाया थांबतात असे गेल्या दोन वर्षात अनेक नेत्यांनी म्हटले होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये असणारे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या विरोधात देखील रस्ते कामाच्या गैरव्यवहाराचा मोठा आरोप होता पण महाविकास आघाडी सरकार कोसळताच कडू यांना क्लिन चीट मिळाली आहे. कडू हे देखील शिवसेनेतील बंडखोर एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेले आहेत. अस्तित्वात नसलेल्या तीन रस्त्यांच्या कामात १ कोटी ९५ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप बच्चू कडू यांच्यावर होता. वंचित बहुजन आघाडीने या प्रकरणाची तक्रार केली होती आणि हे प्रकारें न्यायालयात देखील पोहोचले होते. आता मात्र या एकूण संपूर्ण प्रकरणात पुरावेच नसल्याचे कारण देत पोलिसांनी हे प्रकरण बंद केले आहे.   


अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांना निधी देत बच्चू कडू यांनी १ कोटी ९५ लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला होता. (Big clean chit to Bachchu Kadu) जिल्हा परिषदेला डावलून रस्त्यांची कामे आपल्या मर्जीतील रस्त्यांची कामे नियमबाह्य पद्धतीने केल्याचा आरोप देखील कडू यांच्यावर करण्यात आला होता परंतु आता हे प्रकरण पूर्णपणे बंद झाले आहे. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !