नवरदेव असणारे आमदार महोदय स्वत:च्याच लग्नाला गैरहजर राहिले (MLA absent at his own wedding) आणि त्यांच्याविरोधात होणाऱ्या पत्नीनेच गुन्हा दाखल केला आहे.
मंत्री, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी अशी मंडळी अनेक व्यस्त कार्यक्रमामुळे कार्यक्रमाला अथवा अन्य कुठल्या समारंभास वेळेत उपस्थित राहत नाहीत असा अनकेदा अनुभव असतो. ही मंडळी कधी वेळेवर आली तर आश्चर्य व्यक्त होत असते. पण आपल्याच विवाहाला आमदारच गैरहजर राहण्याची घटना याआधी बहुतेक कधी घडली नाही पण ओरिसामध्ये मात्र अशी एक विस्मयकारक घटना समोर आली असून राजकरणात देखील खळबळ उडाली आहे. केवळ आमदार आपल्या विवाहास अनुपस्थित राहिले एवढेच नाही तर होऊ घातलेल्या पत्नीने त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आणि गुन्हा देखील दाखल झाला आहे.
ओरिसातील बिजू जनता दलाचे आमदार विजय शंकर दास यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जगतसिंहपूर पोलीस ठाण्यात एका महिलेच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वचन देवूनही सदर आमदार महोदय विवाह नोंदणी कार्यालयात उपस्थित राहिलेच नाहीत अशी तक्रार या महिलेने पोलीस ठाण्यात केली आहे. त्यानुसार वेगवेगळ्या कलमानुसार आमदार विजय शंकर दास यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर महिला आणि आमदार दास यांनी विवाह नोंदणी कार्यालयात विवाह करण्यासाठी अर्ज सादर केलेला होता. लग्नासाठी निश्चित केलेल्या तारखेस सदर महिला आपल्या परिवारासह विवाह नोंदणी कार्यालयात दाखल झाल्या पण आमदार दास हे विवाहासाठी कार्यालयात आलेच नाहीत असा या महिलेचा आरोप आहे.
सदर महिलेच्या दाव्यानुसार सदर महिला आणि आमदार दास यांचे तीन वर्षांपासून संबंध आहेत आणि त्यांनी सदर तारखेस विवाह करण्याचे वचन दिले होते. ऐनवेळी विवाहासाठी कार्यालयात आमदार दास आलेच नाही. शिवाय आता आमदारांचे भाऊ आणि त्यांच्या परिवारातील सदस्य यांच्याकडून धमक्या दिल्या जात आहेत. लग्नाचे दिलेले वचन आमदार दास यांनी पूर्ण केले नाहीच आणि आता ते आपला फोन देखील उचलत नाहीत असे सदर महिलेचे म्हणणे आहे.
लग्नाला नकार नाही !
आमदार दास यांनी मात्र वेगळाच खुलासा केला आहे. आपण लग्नाला नकार दिलाच नाही आणि लग्नाच्या नोंदणीसाठी अजून काही दिवस बाकी आहेत त्यामुळे आपण विवाह नोंदणी कार्यालयात गेलो नाही. सदर महिलेने आपणास काहीच कल्पना दिली नाही आणि विवाह नोंदणी कार्यालयात जायचे असल्याबाबत आपणास काहीच माहिती नसल्याचे आ. दास यांनी म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !