BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२२ जून, २०२२

पंढरपूर - सांगोला रस्त्यावर टोळ नाक्यावर अपघात !



पंढरपूर : सांगोला रस्त्यावर झालेल्या एका अपघातात तीन जण जखमी झाले असून आज सकाळी अपघाताची ही घटना घडली आहे. पिकअप वाहन टोळ नाक्याच्या कठड्यावर जाऊन धडकले असल्याने ही घटना घडली. दुसरा अपघात एस टी बस ला झाला आहे.


पंढरपूर - सांगोला मार्गावर सतत अनेक अपघात होतात पण हे अपघात दोन वाहनात धडक होऊन झालेले असतात. आजचा अपघात मात्र  एक वाहन टोळ नाक्याच्या कठड्याला जाऊन धडकले आणि यात देखील तिघे जखमी झाले.  कर्नाटकमधून अननस घेवून एक पिकअप (के ए ३१/ ९३१५) पंढरपूरकडे येत होता. सांगोला - पंढरपूर मार्गावरून येत असताना या रस्त्यावर मेथवडे येथे नव्याने झालेल्या टोळनाक्यावर आल्यावर ते कठड्याला जोरदार धडकले. वेगाने पिकअप आल्यामुळे आणि थेट टोळनाक्याच्या कठड्याला धडकल्यामुळे पिकअपच्या पुढच्या भागाचे मोठे नुकसान झाले आहे. या वाहनाच्या पुढच्या भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला आणि पिकअपमध्ये बसलेले तिघे जखमी झाले आहेत. अपघात होताच परिसरातील नागरिक धावत आले आणि त्यांनी चालकासह अन्य दोघांना वाहनातून बाहेर काढले. जखमी झालेल्यांना रुग्णालयात पाठविण्यात आले असून सदर जखमी हे कर्नाटक राज्यातील आहेत.   

बसला अपघात 

आज राज्य परिवहन महामंडळाच्या एका बसला देखील अपघात झाला आहे. कराडकडे निघालेल्या बस टाकळी बायपासवर हा अपघात झाला. रस्ता दुभाजकावर ही बस वेगाने आदळली त्यामुळे हा अपघात झाला आहे.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !