मिरज : दोन भावांच्या कुटुंबियांनी एकत्रित विष घेवून डॉक्टर कुटुंबियांसह ९ जणांनी आत्महत्या केली असल्याची खळबळजनक आणि तितकीच धक्कादायक घटना समोर आली आहे.
अलीकडे आत्महत्या होण्याचे प्रमाण वाढले आहे. यात तरुणांचा अधिक सहभाग आहे परंतु म्हैसाळ येथील घटनेने सांगली जिल्हा हादरला आहे. दोन भावांच्या कुटुंबीयांनी विष प्राशन करून आपले जीवन संपवले असल्याची घटना घडली आहे. मिरजपासुन १२ किमी अंतरावर असलेल्या म्हैसाळ येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. पशुवैद्यकीय डॉक्टर माणिक यल्लप्पा वनमोरे हे आपल्या कुटुंबासह म्हैसाळ मधील अंबिकानगर येथे राहत होते. शिक्षक असणारे त्यांचे भाऊ पोपट यल्लाप्पा वनमोरे यांचे कुटुंब देखील येथेच वास्तव्यास होते. या दोन्ही बंधुच्या घराचा दरवाजा आज सकाळी उघडला गेला नाही. दवाखान्यातील कर्मचारी तसेच आजूबाजूचे नागरिक यांनी डॉक्टर तसेच इतर सदस्यांना मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु कुणाचाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीला आला.
दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी एकाच वेळी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे दिसून आले असून यात डॉक्टर माणिक यलप्पा वनमोरे, त्यांची आई अक्काताई वनमोरे, पत्नी रेखा माणिक वनमोरे, मुलगी प्रतिमा वनमोरे, मुलगा आदित्य वनमोरे, शिक्षक पोपट यलाप्पा वनमोरे, त्यांच्या पत्नी अर्चना वनमोरे, मुलगी संगीता वनमोरे, मुलगा शुभम वनमोरे अशा ९ जणांचा मृत्यू झाला आहे. (Nine people commit suicide by community poisoning) आर्थिक अडचणीतून आत्महत्येची ही धक्कादायक घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संपूर्ण सांगली जिल्हा या घटनेने हादरून गेला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !