BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३१ मे, २०२२

भाविकांसाठी बांधलेल्या शौचालयाच्या दरवाजांची चोरी !

 


पंढरपूर : वेगवेगळ्या प्रकाराने चोऱ्या होतच आहेत पण आता वारकरी, भाविकांसाठी बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या दरवाजांची देखील चोरी झाल्याचा निंद्य प्रकार पंढरपूर (Pandharpur Crime) तालुक्यात समोर आला आहे.


अलीकडे चोरटे कशाची आणि कशी चोरी करतील हे सांगता येत नाही. उकाड्यामुळे घराच्या दारात अथवा छतावर झोपायला गेले तरी चोरी होते, कामानिमित्त परगावी गेले तरी घरफोडी होते, प्रवासाला निघाल्यावरही चोर आपली 'हात की सफाई' दाखवतात, फिरायला गेलेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळवले जातात आणि वृद्ध नागरिकांना लुटले जाते. कधी पोलीस असल्याची बतावणी करून हातोहात फसवले जाते. जमेल तेथे आणि जमेल तशी चोरी केली जात असून सद्या सुरक्षित काय ? असा प्रश्न उपस्थित व्हावा अशा चोऱ्या सुरु असतानाच पंढरीला येणाऱ्या वारकरी (Ashadhi Yatra) आणि भाविकांसाठी बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाचे दरवाजे देखील चोरून  नेण्याचा अत्यंत संतापजनक प्रकार वाखरी येथे समोर आला आहे. 


आषाढी यात्रा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यात्रीसाठी लाखो भाविक पंढरपूरला येत असतात. एकदम मोठ्या संख्येने भाविक दाखल झाल्याने शौचालयाचा प्रश्न उपस्थित होतो. भाविक पंढरपूर शहराच्या परिसरात आणि चंद्रभागेच्या काठावर शौचास बसतात त्यामुळे अत्यंत दुर्गंधी निर्माण होते आणि यात्रेनंतर स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहतो. आषाढी यात्रेवेळी वाखरी पालखी तळावर लाखो भाविक आणि पालखी सोहळे येत असतात. तेथे येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत वाखरी पालखी तळावर शौचालये बांधण्यात आली आहेत. (Theft of devotees' toilet doors) आषाढी यात्रा जवळ आल्याने प्रशासन तयारीला लागले आहे आणि यावेळी पाहणी करताना भाविकांसाठी बांधलेल्या शौचालयाचे लोखंडी आणि फायबरचे दरवाजेच चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार दिसून आला आहे. 


८४ दरवाजे गायब !

वाखरी पालखी तळावरील युनिट क्रमांक ३ मधील ५६ शौचालयाचे लोखंडी दरवाजे युनिट ४ मधील उचलण्याचे २३ लोखंडी दरवाजे आणि विकास आराखड्यातून बांधलेल्या ५ शौचालयाचे फायबरचे दरवाजे असे एकूण ८४ दरवाजे चोरी गेल्याचे दिसून आले. १ लाख २८ हजार रुपये किमतीचे हे दरवाजे चोरीस गेल्याची तक्रार नगरपालिकेने पंढरपूर ग्रामीण पोलिसात दिली असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   


पाहणीवेळी चोरी निदर्शनास

आषाढी यात्रा काही दिवसांवर येवून ठेपली असून भाविकांना सुविधा मिळण्यासाठी प्रशासन गतिमान झाले आहे. प्रत्येक ठिकाणी जाऊन अधिकारी पाहणी करीत आहेत. अशी पाहणी करताना मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या निदर्शनाला ही बाब आली. त्यांनी याबाबत नगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांचे लक्ष याकडे वेधले. त्यानंतर या दवाजांची चोरी झाली असल्याची बाब समोर आली.  


हे देखील वाचा :>>>>

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !