BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३० मे, २०२२

उजनीच्या पाण्याबाबत स्वाभिमानी आक्रमकच !



पंढरपूर : उजनीचे पाणी आणि लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना अजूनही पंढरीत धगधगतीच असून आजही या योजनेच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उपरीत रस्ता रोखून धरला आणि पालकमंत्री दत्तात्रय धरणे यांच्यावर जोरदार टीका केली. 


इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेस शासनाने अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर निधी दिला असून या योजनेसाठी उजनी धरणातून पाणी देण्यात येणार आहे. उजनीतील पाणी इंदापूर तालुक्यासाठी पळविले जात असल्याचा आरोप सोलापूर जिल्ह्यातील काही राजकीय नेत्यांनी केला पण त्यानंतर सगळे काही शांत झाले असल्याचे सद्या तरी दिसत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मात्र रस्त्यावर उतरून आंदोलन सुरु केले आहे. (Lakadi Nimbodi scheme, Swabhimani movement)नुकतेच अनवली चौकात रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर आता आज पुन्हा उपरी येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोखून धरला आणि आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. 


नियमानुसारच उजनीच्या पाण्याचे वाटप झाले असून इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी ही योजना अत्यंत जुनी आहे, या योजनेस आता शासनाने हिरवा कंदील दाखवला असून वाटणीप्रमाणेच पाणी दिले जात आहे अशा प्रकारचे खुलासे राष्ट्रवादीच्या अनेक मंत्र्यांनी स्पष्टपणे केले आहेत. शिवाय आता शासनाने निधी मंजूर केल्यावर लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेचे काम देखील सुरु करण्यात आले आहे त्यामुळे ही योजना मार्गी लागणार आणि उजनीचे पाणी दिले जाणार हे उघड आहे परंतु या योजनेच्या विरोधात पंढरपूर तालुक्यात आंदोलन सुरूच ठेवण्यात आले आहे. सदरची योजनाच रद्द करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लावून धरली आहे. 


प्रसंगी रक्त सांडू !

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उजनीच्या पाण्याबाबत प्रचंड आक्रमक असून तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर तालुक्यात लढा उभारला आहे. प्रसंगी रक्त सांडू पण उजनीच्या हक्काच्या पाण्याचा एक थेंब देखील नेऊ दिला जाणार नाही असा निर्धार तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी केला आहे 


पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे आज रास्ता रोको आंदोलन करीत लाकडी निंबोडी योजनेस पाणी नेण्यास विरोध दर्शवला. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर जिल्ह्याच्या पाठीत खंजीर खुपसला असून स्वाभिमानी शेतकरी संघटना शांत बसणार नाही, पालकमंत्री भरणे मामा यांनी गोड बोलून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना "मामा" बनवले आहे. पालक मंत्र्यांकडून सोलापूर जिल्ह्याचा अपेक्षाभंग झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी त्यांचा हा डाव खपवून घेणार नाहीत असा इशारा यावेळी देण्यात आला. स्वभिमानीचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, युवा आघाडी राज्य प्रवक्ता रणजीत बागल यांच्यासह साहेबराव जाधव, सचिन आटकळे, मनोज गावंधरे, बाहुबली सावळे, शहाजी जगदाळे, सुशीलकुमार शिंदे, सचिन घोडके, श्रीनिवास नागणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.       

 

उपरी ता.पंढरपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतिने लाकडी निंबोडी योजनेंतर्गत पाणी नेण्यास विरोध म्हणुन रास्तारोकोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव बागल,तालुकाध्यक्ष सचिनजी पाटील,युवा आघाडी राज्य प्रवक्ता रणजित बागल,पक्षाचे ता.अध्यक्ष साहेबराव नागणे,जि.कार्याध्यक्ष सचिन आटकळे,मनोज गावंधरे,बाहुबली सावळे,शहाजीनाना जगदाळे,सुशिलकुमार शिंदे,सचिन घोडके,श्रीनिवास नागणे आदि पदाधिकारी उपस्थित होते.


हे देखील वाचा :>>>>



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !