पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा अकरावा हप्ता उद्या मंगळवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असून देशातील १० कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
किसान सन्मान योजनेच्या अकराव्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याची प्रतीक्षा लाभार्थी शेतकऱ्यांना होती. त्यातच या योजनेतील अनेक गैरप्रकार समोर आलेले असल्यामुळे नियमावली बदलण्यात आली असून केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. या योजनेसाठी पात्र नसलेल्या अनेकांनी योजनेचा फायदा पदरात पाडून घेतला आहे, आता त्यांच्याकडून ही रक्कम वसूल करण्यात येत आहे. आणखीही कुणी अपात्र व्यक्तींनी या योजनेचा गैरफायदा घेऊ नये यासाठी शासनाने इ केवायसी बंधनकारक केली आहे. ज्यांनी ई केवायसी ची पूर्तता केली नाही त्यांना या योजनेतील पुढील हप्ता मिळू शकणार नाही असे या आधीच शासनेने जाहीर केले होते. दहावा हप्ता मिळाल्यानंतर आता अकराव्या हप्त्याची प्रतीक्षा बळीराजाला लागलेली होती.
अकराव्या हप्त्याबाबत कृषी मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे याबाबत माहिती दिली असून उद्या मंगळवारी सिमला येथील 'आझादी का अमृत महोत्सव' या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थिती राहणार असून यावेळी ते नागरिकांशी संवाद साधणार आहेत. केंद्र सरकारच्या सोळा योजना आणि कार्यक्रम यांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांच्या बरोबर ते व्हिडीओच्या माध्यमातून संवाद साधणार असून याच वेळी ते प्रधानमंत्री किसान योजनेचा अकरावा हप्ता हस्तांतरित करणार आहेत. (Kisan Yojana Farmers will get installment tomorrow) ही रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा होणार आहे.
जमा होणार दोन हजार
सदर योजनेचा अकरावा हप्ता उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असून यासाठी २१ हजार कोटी रुपये हस्तांतरित केले जाणार आहेत. याचा देशातील दहा कोटीहून अधिक शेतकऱ्यांना लाभ होणार असून पात्र शेतकरी यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार येणार आहेत. पेरणीच्या हंगामाच्या तोंडावर पात्र शेतकऱ्यांना यामुळे दिलासा लाभणार आहे.
दहा कोटी लाभार्थी
किसान सन्मान योजनेचे देशभरात दहा कोटीपेक्षा अधिक लाभार्थी असून शेतकरी कुटुंबाना दरवर्षी ६ हजार रुपये दिले जातात. दोन हजार रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. जानेवारी महिन्यात दहावा हप्ता मिळाला होता आणि आता उद्या अकरावा हप्ता वितरीत करण्यात येत आहे.
ई केवायसी अनिवार्य !
केंद्र शासनाने योजनेच्या प्रक्रियेत बदल केला असून फसवणूक होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी यावेळी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. याबाबत शासनाने आधीपासून सांगितले असतांना देखील अद्याप अनेक पात्र शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. सदर प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत वेळोवेळी आवाहन करण्यात आले आहे.
हे देखील वाचा :>>>>
खालील बातमीला टच करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !