पंढरपूर : तालुक्यातील सुस्ते येथील महाविद्यालयीन तरुणाचा सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपघाती मृत्यू झाल्याने सुस्ते परिसरात शोककळा पसरली आहे. एकुलत्या एका मुलाच्या अपघाती निधनाने चव्हाण कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.
सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्ग रुंद आणि गुळगुळीत झाल्यापासून या मार्गावर ठराविक ठिकाणी सतत अपघात होत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्याचा परिसर तर अपघाताचे केंद्र बनले आहे. सदर मार्गावर अपघाताची अशी काही ठराविक ठिकाणे असून येथे सतत अपघात होत आहेत. जाण्याऱ्या आणि येणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र लेन असताना देखील अनेक अपघात होत आहेत. रस्ता चकाचक असल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक अत्यंत वेगाने आणि तितकीच बेफिकीरपणे सुरु असते. गावापासून रस्ता जातो तेथे देखील वेगावर नियंत्रण नसते. या रस्त्यावर पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील तरुण आणि महाविद्यालयीन तरुणाला अपघाताचे बळी पडावे लागले आहे.
पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील २१ वर्षे वयाचा ऋषिकेश हरिविजय चव्हाण हा विद्यार्थी भिगवण येथील अनुसया इन्स्टिट्यूट येथे बी फार्मसीचे दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होता. आपल्या दुचाकीवरून तो क्लासला निघाला असता त्याला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात तो गंभीररित्या जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला तातडीने इंदापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु दरम्यानच्या काळात त्याचा मृत्यू झाला होता. (Accidental death of a young student) या प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुस्ते गावात शोक !
गावातला तरुण आणि होतकरू तरुण अपघातात मृत्युमुखी पडल्यामुळे पंढरपूर तालुक्यातील सुस्ते आणि परिसर शोकाकुल असून हळहळ व्यक्त होत आहे. मयत ऋषिकेश हा चव्हाण कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता त्यामुळे त्याच्या कुटुंबावर तर असह्य आघात झाला आहे.
हे देखील वाचा :>>>>
खालील बातमीला टच करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !