पुणे : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना २४ तासात जीवे मारून टाकण्याची मोठी धमकी अज्ञात व्यक्तीने दिली आहे.
रुपाली चाकणकर या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षा असताना त्यांनी अत्यंत आक्रमकपणे काम केले असून त्या त्यांच्या आक्रमकपणा बद्धल ओळखल्या जातात. चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या जागी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. सद्या चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा असून या पदावर असताना त्यांना गंभीर स्वरुपाची धमकी आली आहे. अज्ञात व्यक्तीने ही धमकी दिली असून २४ तासात जीवे ठार मारण्याची ही धमकी फोनवरून देण्यात आली आहे.
यापूर्वी देखील चाकणकर यांना धमकी मिळाली होती. गेल्या काही दिवसातील ही तिसरी धमकी असून चोवीस तासात जीवे मारण्याची ही धमकी आहे त्यामुळे खळबळ उडाली आहे. धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीने ही धमकी दिली असली तरी धमकीचे कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही. धमकीचा फोन राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयात आला असून याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना माहिती देण्यात आली आहे. (Threats to Women's Commission Chairperson Rupali Chakankar) ही धमकी कशासाठी देण्यात आली याबाबतची माहिती अद्याप समोर आली नसली तरी खळबळ मात्र उडाली आहे.
यापूर्वीही धमकी
पुणे येथे सिंहगड रस्त्यावर धायरी येथे चाकणकर यांचे कार्यालय असून २६ डिसेंबर २०२० रोजी एका अज्ञात व्यक्तीने फोन करून हे कार्यालय पेटवून देण्याची धमकी दिली होती. यावेळी चाकणकर या कार्यालयात नव्हत्या पण त्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता .
तुमचा कार्यक्रम करू
रुपाली चाकणकर यांना धमकी येण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी देखील त्यांना असाच अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन आला होता आणि त्यावेळी "तुमचा कार्यक्रम करू " अशा प्रकारची भाषा वापरली गेली होती
नगर कनेक्शन !
आजचा धमकीचा फोन दिल्ली येथील राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयात आला होता आणि धमकीचा हा फोन अहमदनगर येथून आला असल्याची माहिती मिळू लागली असल्याचे समजते.
हे देखील वाचा :>>>>
खालील बातमीला टच करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !