BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

११ मे, २०२२

प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज पुन्हा अडचणीत !




पुणे : स्पष्ट आणि परखड बोलणारे आणि समाज प्रभोधनाचा वसा घेतलेले प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा आपल्या वक्तव्याने अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यांच्या वक्तव्याची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिव्यांग कल्याण आयुक्तांनी दिले आहेत. 


प्रख्यात कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचा राज्यभर प्रचंड लौकिक आहे, त्यांची विधाने रोखठोक असली तरी देखील त्यांच्या किर्तनाला प्रचंड गर्दी होत असते. कीर्तनात सहज बोलता बोलता ते समाजातील चुकीच्या बाबीवर ते विनोदाच्या शैलीतून प्रहार करीत असतात. वास्तव मुद्यांना स्पर्श करीत ते समाजाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करीत असतात. इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनास प्रचंड गर्दी तर होताच असते परंतु त्यांच्या कीर्तनाच्या तारखा मिळणेही मुश्कील असते एवढे ते लोकप्रिय आहेत. त्यांच्या काही विधानावर मात्र अधूनमधून आक्षेप घेतले जातात आणि त्यातून बराच वाद उफाळून येतो याचीही काही उदाहरणे समोर आली आहेत. त्यांच्या किर्तनाचे व्हिडीओ यु ट्युबवर अनेक लोक पहात असतात परंतु वाद निर्माण होत असल्यामुळे इंदुरीकर महाराज यांनी अनेकादा यु ट्युबरबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केलेली आहे.

 
इंदुरीकर महाराज यांच्या काही विधानामुळे त्यांना न्यायालयापर्यंत देखील जावे लागले आहे त्यामुळे आपल्या किर्तनाचे चित्रीकरण करण्यास त्यांनी हरकत घेतलेली आहे. त्यांच्या किर्तनास जाताना  मोबाईल वर देखील मनाई करण्यात आली परंतु त्यानंतरही एक विधानाप्रक्रणी इंदुरीकर महाराज अडचणीत येण्याही चिन्हे दिसू लागली आहेत. पुण्यातील राजेंद्र वाकचौरे आणि दत्तात्रय भोसले यांनी इंदुरीकर महाराज यांच्या संदर्भात दिव्यांग कल्याण आयुक्त यांच्याकडे तक्रार केली आहे. (Indurikar Maharaj in trouble again) 'माझ्या किर्तनाचे व्हिडीओ यु ट्यूबवर टाकणाऱ्यांची मुले दिव्यांग जन्माला येतील' असे इंदुरीकर महाराज यांनी म्हटल्याची या दोघांची तक्रार आहे. या विधानामुळे दिव्यांग व्यक्तींच्या भावना दुखावल्या असून दिव्यांग व्यक्ती हक्क कायद्यानुसार हा गुन्हा आहे त्यामुळे इंदुरीकर महाराज यांच्यावर कारवाई व्हावी अशी या दोघांची मागणी आहे. 


चौकशीचे आदेश 
दिव्यांग कल्याण आयुक्त यांच्याकडे तक्रार केल्यानंतर आयुक्तांनी तक्रारीची चौकशी करावी आणि दोषी असल्यास कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा असे आदेश दिव्यांग कल्याण आयुक्त यांनी अकोला पोलीस अधीक्षक यांना दिले आहेत. तक्रारीत तथ्य आढळल्यास दोषीविरोधात दिव्यांग व्यक्त हक्क अधिनियम २०१६ मधील कलम ९२ (अ) नुसार त्वरित गुन्हा दाखल करणायत यावा असे देखील या आदेशात नमूद करण्यात आले आहे. 


यापूर्वीही विधान वादात 
इंदुरीकर महाराज यांच्या विधानांवर यापूर्वीही आक्षेप घेण्यात आले होते आणि वाद निर्माण झाला होता. सम तिथीला स्त्री संग झाला तर मुलगा जन्माला येतो, विषम तिथीला मुलगी जन्माला येते याबाबत इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या विधानावर वाद उफाळला होता. विधानावर वाद निमाण होत असल्याने इंदुरीकर महाराज व्यथित झाले होते.  


हे देखील वाचा >>>


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !