BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ मे, २०२२

एका तासात ५४ शेळ्यांचा मृत्यू !

 



इंदापूर : मोठी अपेक्षा ठेवून शेळीपालन व्यवसाय करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन तरुणांना मोठा फटका बसला असून एका तासात ५४ शेळ्या दगावल्याने या तरुणांना धक्का बसला आहे. काहीतरी वेगळे करण्याचे धाडस करणाऱ्या तरुणांच्या पदरी मोठी निराशाच पडली.   


शेती परवडत नसल्याने अनेक शेतकरी शेतीला जोडून काही अन्य व्यवसाय करीत असतात. अलीकडे शेळीपालन करण्याकडे अधिक ओढा असल्याचेही दिसत आहे. पारंपारिक शेतीऐवजी काही वेगळा प्रयोग करून आर्थिक उत्पन्न मिळविण्यासाठी अनेक तरुण नेटाने पुढे येतात आणि काहीतरी वेगळे करण्यासाठी परिश्रम घेत असतात. अनेकदा त्यांच्या परिश्रमाला यश येते तर कधी अपयशाला देखील सामोरे जावे लागते. इंदापूर येथील दोन तरुणानी मोठ्या परिश्रमाने शेळीपालन व्यवसाय उभारला पण त्यांच्यावर अचानक अनाकलनीय संकट ओढवले असून मोठी निराशा त्यांच्या पदरी पडली असल्याचे दिसून येत आहे. 


नितीन पांढरे आणि अतुल घोडके या तरुणांनी शेळी पालन करून आर्थिक उभारी घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी जिल्ह्यातील विविध बाजारात फिरून शेळ्या आणि एका बोकडाची खरेदी केली. शेळीपालन करून आर्थिक विकास साधायचे स्वप्नं पाहत असलेल्या या दोन तरुणांना मात्र एक भयावह वास्तव पाहण्याची वेळी आली. त्यांनी आणलेल्या शेळ्यांचा मृत्यू होऊ लागला आणि त्यांना धक्का बसला. एकामागून एक असे करीत शेळ्या मृत्युमुखी पडत राहिल्या आणि केवळ एका तासात त्यांच्या ५४ शेळ्या मृत्युमुखी पडल्या. काय होतेय हे समजायच्या आत तर सगळे काही संपले होते. (Fifty-four goats die in an hour) केवळ एका तासात त्यांचे स्वप्नं आणि केलेले परिश्रम धुळीस मिळाले आणि पदरी फक्त निराशा उरली. 


शून्याकडून शुन्याकडेच !   
कष्ट करून शेळीपालन व्यवसाय मोठा करण्याचे स्वप्नं या तरुणांनी पाहिले होते आणि त्यासाठी जीवापाड कष्ट घेणे त्यांनी सुरु केले होते. मोठा खर्च करून त्यांनी शेळी पालनाचा व्यवसाय उभा केला. शून्यातून त्यांनी विश्व निर्मिती करण्याचे स्वप्नं पहिले पण शुन्याकडून त्यांना शुन्याकडेच जावे लागले त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होऊ लागली आहे.

  
अनाकलनीय प्रकार !
अचानक ५४ शेळ्यांचा मृत्यू झाल्याची ही घटना सर्वांनाच बुचकळ्यात टाकणारी ठरली. एका तासाच्या अंतरात ५४ शेळ्या कशामुळे मृत्युमुखी पडल्या याचे उत्तर कुणाकडेच नव्हते. पशुवैद्यकीय अधिकारी यांनी देखील पाहणी केली परंतु त्यांना अंदाज बांधता आला  नाही. त्यांनी प्राथमिक तपासणी केली, चार शेळ्यांचे शवविच्छेदन करून नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. या अहवाल आल्यावरच यातील काही चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. 



हे देखील वाचा >>>



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !