BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० मे, २०२२

पाचशे रुपयाची लाच घेताना पोलीस रंगेहात पकडला !

 



सोलापूर : येथील सदर बजार पोलीस ठाण्यातील एक पोलीस कर्मचारी पाचशे रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यश आले आहे. 


लाच घेणे कायद्याने गुन्हा असला तरी लोकसेवक बिनधास्तपणे लाच मागतात आणि स्वीकारतात. फुकटच्या पैशाचा मोह अनेकदा अडचणीत आणतो आणि काही किरकोळ रकमेसाठी तुरुंगात देखील जावून बसावे लागते. रोज कुठे ना कुठे सरकारी अधिकारी, कर्मचारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकतो तरीही लाचेची फुकटी सवय काही केल्या जाताना दिसत नाही. महसूल आणि पोलीस विभागात आजवर अनेक कर्मचारी आणि अधिकारी सापळ्यात अडकले आहेत. लाच मागण्यासाठी यांना किरकोळ कारण देखील पुरेसे ठरते याचे एक उदाहरणच आज सोलापुरात समोर आले आहे. केवळ पोलीस ठाण्यात हजेरी लावल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी देखील एका पोलीस कर्मचाऱ्याने लाच मागितली आणि पाचशे रुपयांची लाच घेताना त्याला रंगेहात पकडण्यात आले.

 
तक्रारदार व्यक्तीच्या विरोधात सीआरपीसी १०७ अन्वये कारवाई करण्यात आली होती त्यानुसार २ मे ते १० मे या कालावधीत त्याला सदर बझार पोलीस ठाण्यात हजेरी देण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार तक्रारदार यांनी नियमितपणे पोलीस ठाण्यात हजेरीही लावली होती. हजेरी लावल्याबद्धलचे प्रमाणपत्र त्यांनी मागितले असता पोलीस नाईक नाना वेशां शिंदे (अरविंद धाम, सोलापूर) याने त्यांना पाचशे रुपयांची मागणी केली.  प्रमाणपत्र देण्यासाठी पोलीस नाईक शिंदे यांनी पाचशे रुपये मागितल्याने तक्रारदार व्यक्तीने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. (Police caught red-handed taking bribe) सदर रक्कम सोमवारी देण्याचे ठरले होते परंतु लाचेची ही रक्कम आज देण्यात आली. 


लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी करून सदर बजार पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक नाना शिंदे याला लाच घेतल्याप्रकरणी रंगेहात पकडले असून पुढील कारवाई सुरु केली आहे. सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागागाने ही कारवाई केली असून सोलापूर पोलीस दलात या घटनेने खळबळ उडाली आहे.  


हे देखील वाचा >>>


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !