BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ जाने, २०२३

गुप्तांग कापून तरुणाचा खून, घटना पोलिसांच्या गस्तीत उघडकीस !

 


शोध न्यूज : एका तरुणाचे गुप्तांग कापून अत्यंत अमानुष पणे खून केल्याची घटना उघडकीस आली असून सांगोला तालुक्यात या घटनेने खळबळ उडवून दिली आहे. 


सोलापूर जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत असून चोऱ्या, मारामारी, अत्याचार अशा प्रकरचे गुन्हे तर होतच आहेत परंतु हत्येच्या घटना देखील घडू लागल्या आहेत. सांगोला तालुक्यातील एखतपूर - आचकदाणी रस्त्यावर एका तरुणाचा खून केला असल्याची बाब आज उघडकीस आली आहे. सांगोला पोलीस रात्रीच्या गस्तीवर असताना त्यांच्या निदर्शनास ही बाब आली आहे. सांगोला पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत कुमार काटकर व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी एखतपुर ते अचकदाणी रस्त्यावर रात्री गस्त घालीत होते. यावेळी त्यांना रस्त्यालगत एक  तरुण पडलेला दिसला. तपासणी केली असता या तरुणाचे गुप्तांग कापून खून केला असल्याची बाब स्पष्ट झाली असून तरुणाची ओळख देखील पटली आहे. सांगोला तालुक्यातील एखतपूर (काखेची वस्ती) येथील संजय तुकाराम इंगोले या ३४ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. 


सदर प्रकार निदर्शनास आल्यानंतर वरिष्ठ अधिकारयांसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ही हत्या कुणी केली याची माहिती नसून अशा प्रकारच्या हत्या या अनैतिक संबंधातून झाल्याच्या घटना यापूर्वी उघड झालेल्या आहेत. (Murder of youth by cutting private part, Incidents revealed during police patrols) संजय इंगोले याची हत्या  नेमकी कुठल्या कारणाने झाली हे तपासात उघडकीस येणार असून सांगोला पोलिसांनी पुढील कार्यवाही सुरु केली आहे. या घटनेने सांगोला तालुक्यात मात्र मोठी खळबळ उडाली आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !