BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ जाने, २०२३

सोलापुरात पालकमंत्र्यांचा ताफा रोखला


 शोध न्यूज : 'पालकमंत्री, न्याय द्या !' म्हणत आज सोलापुरात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा ताफा तरुणांनी रोखला त्यामुळे नियोजन भवनाच्या परिसरात काही काळ गोंधळ उडाला.


सोलापूर  जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज सोलापूर दौऱ्यावर होते. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस ते उपस्थित होते. तेथील बैठक संपवून ते बाहेर पडले असताना रस्त्यातच दोन तरुणांनी अचानक समोर येत त्यांचा ताफा रोखला. 'पालकमंत्री न्याय द्या .. न्याय द्या' अशा घोषणा हे तरुण देवू लागले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलिसांची देखील तारांबळ उडाली. पोलिसांनी लगेच हस्तक्षेप करीत या तरुणांना बाजूंला घेतले. पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून हा तरुण मोहोळ तालुक्यातील तांबोळे येथील अभिजित गोरख नेटके हा आहे.  तांबोळे गावात रामचंद्र नेटके यांनी ग्रामपंचायतीच्या जागेत अतिक्रमण करून घराचे बांधकाम सुरु केले आहे. सार्वजनिक रस्त्यावर घरकुल बांधकाम केल्याने रस्ता वाहतुकीस अडथळा होणार आहे याबाबत ग्रामपंचायत आणि गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे आपण पालकमंत्र्यांची गाडी अडवली असल्याचे अभिजित नेटके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 


ग्रामपंचायत ही गावकरी मंडळींच्या अडचणी सोडविण्यासाठी असते परंतु अनेक ग्रामसेवक केवळ पगारापुरते काम करीत असतात अशा तक्रारी गावकरी करीत असतात. ग्रामसेवक व्यवस्थित काम करीत नसेल तर गट विकास अधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे असते (The Guardian Minister's convoy was stopped in Solapur) परंतु असे घडत नाही तेंव्हा  लोक थेट मंत्र्यांपर्यंत धाव घेतात आणि कधीकधी अशा प्रकारे मंत्र्यांच्या गाड्या रोखल्या जातात. स्थानिक पातळीवर नागरिकांचे काम झाले तर अशा घटना घडणार नाहीत हे देखील एक सत्य आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !