BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२४ ऑग, २०२२

सोलापूर जिल्ह्यात अपायकारक दुषित पाणी !


शोध न्यूज : सोलापूर जिल्ह्यातील २४२ गावे दुषित पाण्यावर आपली तहान भागवत असून यात पंढरपूर तालुक्यातील सर्वाधिक गावांचा समावेश असल्याची बाब तपासणीत उघड झाली आहे.


पाणी हे जीवन आहे आणि दुषित पाणी पिल्याने आरोग्याला अपाय होऊ शकतो, सतत दुषित पाणी पिण्यात आल्यास पोटाचे, हाडांचे आणि किडनीचे आजार उद्भवतात. त्यामुळे शुद्ध पाणी पिणे हे आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे परंतु गावागावात मिळेल तसे पाणी पिण्याशिवाय पर्याय नसतो. कधी नदी नाल्यातले तर कित्येकदा साठलेले पाणी पिले जाते. अनेक लोक पिण्याच्या पाण्याबाबत जागरूक नसतात आणि कुठेही कसलेही पाणी पितात, त्याचा परिणाम आरोग्यावर होत असतो. सोलापूर जिल्ह्याच्या बाबतीत एका धक्कादायक बाब समोर आली असून सोलापूर जिल्ह्यातील तब्बल २४२ गावे आजही दुषित पाणी पितात. हा प्रकार पाण्याच्या तपासणीतून आढळून आला आहे. 


भूजल विभागाने केलेल्या पाणी नमुना तपासणीत ही बाब समोर आली असून टीडीएस, लोह, पीएच, क्लोराईड, सल्फेट आणि हार्डनेस हे आरोग्य विभागाने निश्चित केलेल्या क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात असल्याचे आढळून आले आहे.   सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील प्रत्येक गावातील पाण्याचे नमुने भूजल विभागाने घेतले होते. एकूण ९ हजार ६८३ नमुने घेण्यात आले आणि यातील ९०८ नमुने चिंताजनक आढळून आले आहेत. या तपासणीत अत्यंत धक्कादायक बाबी दिसून आल्या असून असे पाणी गावागावातील नागरिक प्राशन करीत आहेत. एकूण २४२ गावातील पाण्याच्या नमुने सदोष आढळून आले आहेत. (
Contaminated water in many villages of Solapur district.) या पाण्याचा टीडीएस दोन हजाराहून अधिक तर लोहाचे प्रमाणही एक मिलीग्रॅमपेक्षा अधिक आढळून आले आहे. पीएच, अल्कालीनिटी, सल्फेट, क्लोराईड या बाबी देखील क्षमतेपेक्षा अधिक दिसल्या असून या पाण्यातच नागरिकांच्या आजाराचे मूळ कारण असल्याचे उघडकीस आले आहे.      


'कठीण' आहे म्हणे !

सोलापूर जिल्ह्यातील २४२ गावातील दुषित आढळून आलेले पाणी हे काही दिवसात स्वच्छ होणे कठीण असल्याचे अधिकारी सांगत आहेत. गावातील उघड्या आणि तुंबलेल्या गटारी, पाण्याच्या स्त्रोताजवळ सांडपाण्याचे साठून राहणे, पिकांसाठी होत असलेल्या रासायनिक खतांचा भडीमार अशा प्रमुख कारणामुळे पिण्याचे पाणी दुषित होत आहे. असे दुषित पाणी पिऊन नागरिक आपल्या आरोग्याला मोठा धोका उत्पन्न करीत आहेत.   


पंढरपूर सर्वाधिक !

सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावात दुषित पाणी आढळून आले असले तरी पंढरपूर तालुक्यातील सर्वाधिक गावांचा यात समावेश आहे. तब्बल ५३ गावात दुषित पाणी आढळून आले आहे. फुलचिंचोली, गोपाळपूर, गुरसाळे, होळे, जाधववाडी, करकंब, कौठाळी, खेड भाळवणी, खेड भोसे, सुगाव खुर्द, पिराची कुरोली, पोहोरगाव, पुळूज, पुळूजवाडी, रांझणी, शंकरगाव, शेळवे, शिरढोण, अनवली, अव्हे, बाभूळगाव, बार्डी, भंडीशेगाव, भटुंबरे ,  बोहाळी, चळे, चिलाईवाडी, चिंचोली भोसे, उजनी, उपरी, विटे, वाखरी, बिटरगाव, सुस्ते, टाकळी गुरसाळे, टाकळी, तारापूर, तावशी, तुंगत, मगरवाडी, मुंढेवाडी, नेमतवाडी, ओझेवाडी, पटवर्धन कुरोली, पेहे,  सिद्धेवाडी,  देगाव, देवडे, एकलासपूर,  कोंढारकी, कोर्टी या गावांचा समावेश आहे 


येथे क्लिक करा ! 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !