BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२४ ऑग, २०२२

चाळीस लाख दे, तर घरात रहा ! विवाहितेचा छळ

 


शोध न्यूज : 'घरात राहायचे असेल तर चाळीस लाख रुपये दे' अशी अजब मागणी करीत विवाहितेचा छळ (Crime) करण्याची अजब घटना समोर आली असून चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नात्यात एक प्रकारे भीक मागण्याची एक वेगळीच प्रथा झाली असून हुंड्याच्या नावाखाली रोख रक्कम, गाडी, शेती घेण्यासाठी अथवा पेट्रोल पंप टाकण्यासाठी माहेराहून रक्कम आणण्यासाठी आपल्याच पत्नीचा, सुनेचा छळ केला जातो. मुलीशी लग्न केले म्हणजे तिच्या बापावर उपकारच केले आहेत आणि  तिच्या माहेरी नोटा छापल्या जातात असा मूर्खपणाचा समज करून घेतला जातो. आपली हौस भागविण्यासाठी आपल्याच घरातील सदस्याला वेगवेगळ्या प्रकारे छळले जाते. पैशासाठी कधी तिचा जीव घेतला जातो तर कधी या त्रासाला कंटाळून विवाहित महिला आपले जीवन संपवते. अशा प्रकारच्या विरोधात अनेक कायदे अस्तित्वात आहेत पण तरीही हा 'भिक्कार छाप' प्रकार सुरूच असल्याचे दिसते. 


असाच एक अत्यंत धक्कादायक प्रकार सांगोला तालुक्यातील मेथवडे येथे अनुभवास आला असून पिडीत विवाहित महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ४५ वर्षाच्या विवाहित महिलेला तब्बल ४० लाख रुपयांची मागणी केल्याची आणि  त्यासाठी छळ सुरु असल्याची ही धक्कादायक तक्रार आहे. सांगोला तालुक्यातील एखतपूर येथील इंगोले कुटुंबातील मुलीचे सन २००८ साली मेथवडे येथील प्रशांत मारुती मिसाळ याच्याशी झाले होते. त्यांना पियुष आणि परी अशी दोन अपत्ये देखील झालेली आहेत. विवाह झाल्यावर सुरुवातीला काही काळ व्यवस्थित नांदवले पण नंतर मात्र घरात त्रास सुरु झाला. 'तुला स्वयंपाक येत नाही, तू व्यवस्थित काम करीत नाहीस' असे म्हणून पती  प्रशांत मारूती मिसाळ, सासू, सौ उषा मारुती मिसाळ आणि सासरे मारूती विठोबा मिसाळ हे त्रास देवू लागले असे पिडीत विवाहितेने फिर्यादीत म्हटले आहे. 


स्वयंपाकाचे आणि कामाचे कारण दाखवून नंतर मारहाण करण्यास देखील सुरुवात केली. त्रास सुरु असला तरी सासरी नांदायचे असल्याने हा त्रास प्रतिभा मिसाळ या सहन करीत गेल्या. त्यानंतर मात्र माहेराहून चाळीस लाखांची रक्कम आणण्यासाठी त्रास देणे सुरु केले. घरखर्चासाठी आणि नवीन व्यवसाय करण्यासाठी चाळीस लाखांची मागणी करू  लागले. त्यासाठी मानसिक आणि शारीरिक त्रास देखील देण्यात येवू लागला. (Harassment of married woman for money) उपाशीपोटी ठेवण्यात येऊ लागले. माहेरी ही तक्रार सांगितली तेंव्हा आई वडील आणि अन्य मंडळी आली आणि पती, सासू, सासरे यांना समजावून सांगितले. त्यानंतर काही दिवस व्यवस्थित गेले की त्यानंतर पुन्हा छळ सुरु करण्यात आला आणि या घरात राहायचे असेल तर माहेरहून चाळीस लाख रुपये आणावेच लागतील असे म्हणत छळ करण्यात येवू लागला. 


सुमारे ९ वर्षेपुर्वी  सासु सासरे यांनी घरगुती व शेतातील कामासाठी मंगळवेढा तालुक्यातील मारापूर  येथील  स्वाती विलास असबे या महिलेस आणलेले आहे, सद्याही हे महिला आपल्या  सासरी काम करीत आहे. मला, माझा पती प्रशांत, सासु उषा आणि सासरे मारुती विठोबा मिसाळ  हे स्वाती आसबे हिच्या सांगण्यावरून आणि तिचे ऐकुन मला त्रास करीत आहेत. माझी दोन्ही मुले देखील नवऱ्याच्या व सासुच्या ऐकण्यात असल्यामुळे माझी  दोन्ही मुले माझ्या बाजुने आजपर्यत बोलले नाहीत. माझ्या  दोन्ही मुलांना, माझी कोणत्याही प्रकारची काळजी नाही आणि मला त्रास होत असतानाही माझी मुले सासूच्या बाजूने बोलत असतात. पती, सासू, सासरे आणि स्वाती आसबे (मारापूर, ता. मंगळवेढा) यांनी सतत आपल्याला मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचे पिडीत महिला प्रतिभा मिसाळ यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. 


सदर चौघांनी मानसिक, शारीरिक छळ केला असून आपल्याला उपाशीपोटी देखील ठेवण्यात आले आहे. नुकतेच म्हणजे २० ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पती प्रशांत याने मारहाण केली त्यामुळे दुसऱ्या दिवशी आपण माहेरी निघून आलो. लग्नात केलेले दागिने देखील सासू आणि सासऱ्याने काढून घेतले."तुझ्या आई वडिलांनी लग्नात आमचा मानपान केला नाही, तुला या घरात नांदायचे असेल तर पैसे द्यावेच लागतील" असे म्हणत नवीन व्यवसाय करण्यासाठी चाळीस लाख रुपयांची मागणी केली आहे. या पैशासाठी दमदाटी आणि मारहाण देखील करण्यात आली आहे अशा प्रकारची तक्रार पिडीत महिला प्रतिभा मिसाळ यांनी केल्यानुसार पोलिसांनी विविध कलमान्वये सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी प्रतिभा यांचा पती  प्रशांत मारूती मिसाळ,  सासू उषा मारुती मिसाळ आणि सासरा मारूती विठोबा मिसाळ या चौघांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


तबब्ल चाळीस लाखांच्या मागणीबाबत विवाहित महिलेने पोलिसात तक्रार केल्यानंतर मेथवडे परिसर आणि सांगोला तालुक्यातही चर्चेचा विषय बनला आहे. चाळीस लाख ही रक्कम थोडीथोडकी नसल्याने या मागणीचे आश्चर्य देखील व्यक्त होऊ लागले आहे.  पैशासाठी विवाहित महिलांचा छळ होतो पण तब्बल चाळीस लाखांची मागणी केल्याची तक्रार केल्याने अनेकांनी तोंडात बोटे घातली आहेत. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !