BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

११ मे, २०२२

दुरुस्तीचे काम करीत असताना दोन कर्मचाऱ्यांना विजेचा धक्का !

 



सोलापूर : दुरुस्तीचे काम करीत असताना अचानक सुरु झालेल्या विद्युत पुरवठ्यामुळे दोन कर्मचाऱ्यांना शॉक बसला असून दोघानाही जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

बुधवारच्या दिवशी विजेची अनेक देखभाल दुरुस्तीची कामे केली जातात आणि अशीच कामे करताना आज सोलापुरात ही दुर्घटना घडली आहे. विजेच्या दुरुस्तीची कामे करताना वीज पुरवठा काळजीपूर्वक बंद करण्यात येत असतो आणि त्यासाठी परमीट देण्याची पद्धत आहे. सदर परमीट परत आल्याशिवाय आणि पूर्ण खात्री झाल्याशिवाय विजेचा पुरवठा सुरु केला जात नाही. असे असतानाही विजेच्या कामे केली जात असताना अचानक विद्युत पुरवठा सुरु होतो आणि त्यात विद्युत कर्मचाऱ्यांचा शॉक बसून अथवा विजेच्या खांबावरून खाली पडून मृत्यू होत असल्याच्या घटना वारंवार घडत असतात. वीज कर्मचारी जीवावर उदार होऊन हे काम करीत असतो पण कुणाच्यातरी बेपर्वाईमुळे त्यांचा जीव धोक्यात येतो. अशी घटना आज सोलापूर येथे पुन्हा एकदा घडली असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. 

रामलाल चौक शाखेंतर्गत वरिष्ठ तंत्रज्ञ शेख रब्बानी अहमद (वय ३७) आणि कंत्राटी कर्मचारी अझहर चांद तांबोळी ( वय २२)  हे दोघे वीज यंत्रणेच्या देखबाल दुरुस्तीचे काम करीत होते. सिव्हील वीज उपकेंद्रातून निघणाऱ्या ११ के व्ही रामलाल चौक फिडरवर रेल्वे स्टेशन फिडरवर झाडांच्या फांद्या छाटण्याचे काम ते करीत होते. या परिसरात काही झाडांच्या फांद्या विजेचा ताराना स्पर्श करीत होत्या त्यामुळे त्या काढून टाकणे आवश्यक होते. हे काम ते महावितरणच्या शिडी असलेल्या गाडीच्या मदतीने करीत होते. (Two employees injured in electric shock) याच वेळी अचानक विजेच्या तारांत विद्युत पुरवठा सुरु झाला आणि या दोघानाही विजेचा धक्का बसला. 

दोघेही जखमी
वरिष्ठ तंत्रज्ञ शेख रब्बानी अहमदआणि कंत्राटी कर्मचारी अझहर चांद तांबोळी  हे दोघेही विजेच्या जोरदार धक्क्याने जखमी झाले असून दोघांना रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमी असलेल्या एकास सोलापूर येथील एका खाजगी रुग्णालयात तर एकास शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. 

अलीकडील दुसरी घटना
अलीकडील काळातील ही दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी एका पेट्रोल पंपाच्या जवळ शिडीच्या आधाराने झाडाच्या फांद्या काढताना अचानक वीज पुरवठा सुरु झाला आणि विजेचा जोराचा धक्का लागून सुभाष भरंगडे यांचा  मृत्यू झाला होता. ही घटना अद्याप ताजी असतानाच आज दुसरी घटना घडली आहे. त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी न घेतली जाण्याचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.   



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !