BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३१ मे, २०२२

बंदुकीचा धाक दाखवून हॉटेल मालकाची लूट !

 


मोहोळ : चार चाकी गाडी भर रस्त्यात अडवून बंदुकीचा धाक दाखवत आणि लोखंडी पाईपने मारहाण करीत चर अज्ञात भामट्यांनी मोहोळ तालुक्यातील खंडाळी येथील हॉटेल व्यावसायिकास अडीच लाखाला लुटण्याची थरारक घटना घडली आहे. 


अलीकडे चोऱ्यांचे प्रमाण वाढले असताना आता रस्त्यात रोखून शस्त्राचा धाक दाखवत लुटमार करण्याचे प्रकार देखील घडू लागले आहेत.  खंडाळी येथील हॉटेल मालक सुरेश उर्फ बबलू प्रकाश गुंड यांची गाडी रोखून त्यांना शस्त्राचा धाक दाखवला आणि लोखंडी पाईपने मारहाण करून चित्रपटस्टाईल थरार घडवत गुंड यांच्याकडील अडीच लाखांची रक्कम लुटून नेल्याची थरारक घटना घडली आहे. सुरेश गुंड हे त्यांच्या सहकाऱ्यासह नाना निवृत्ती चव्हाण यांचे किराणा मालाचे पैसे आणण्यासाठी निखील मार्केटिंग पुणे यांच्याकडे गाडीतून (एम एच ४५ ए ई ५३४८) गेले होते. सदर रक्कम घेवून पुण्यातून ते रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास खंडाळीकडे येण्यास निघाले आणि मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास सोबत असलेले लाला मुळे यांना त्यांनी मोडनिंब येथे सोडले. (Robbery at gunpoint)


मुळे यांना मोडनिंब येथे सोडून ते तेथून खंडाळीकडे निघाले. दरम्यान पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास शेटफळ येथील विश्रामगृहाच्या समोर ते पोहोचले असताना त्यांच्या मागून आलेल्या दोन गाड्या त्यांच्या समोर आल्या आणि उभ्या राहिल्या. यातील एक गाडी पांढऱ्या रंगाची स्कार्पिओ होती तर दुसरी ग्रे रंगाची स्विफ्ट कार होती. दोन्ही गाड्यातून मिळून चौघेजण खाली उतरले आणि एकाने गुंड यांच्या गाडीच्या काचेवर अंडे फेकून मारले. दुसऱ्या एकाने गुंड यांच्या गाडीचा दरवाजा उघडून गुंड यांना खाली उतरण्यास भाग पाडले. नेमके याच वेळी एकाने सुरेश गुंड यांच्या डोक्याला बंदूक लावून धमकी दिली. (Hotel owner robbed at gunpoint) आवाज केलास तर गोळ्या घालण्याची भीती त्यांनी घातली. अचानक घडलेल्या या प्रकाराने सुरेश गुंड गोंधळून आणि घाबरून गेले होते. अचानक समोर आलेल्या चौघाचा मुकाबला करणे त्यांचा शक्य नव्हते. 


अडीच लाख लुटले !

चित्रपटात शोभावा असा हा थरार भर रस्त्यावर सुरु होता. तेवढ्यात एकाने गुंड यांनी आपल्या गाडीत ठेवलेली अडीच लाखाची पिशवी घेतली. सदर रक्कम घेतल्यानंतर त्यांनी गुंड यांची गाडी लॉक केली आणि तेथून पसार झाले. काही क्षणात हा सगळा थरार घडला होता. 


विना क्रमांकाच्या गाड्या

लुटारू दोन गाड्या घेवून आले होते पण दोन्ही गाड्यांना नंबरप्लेट नव्हत्या. शिवाय त्यांच्या चेहऱ्यावर मास्क लावलेले होते आणि पायात बूट घातलेले होते. जीन्स, ट्रॅक सूट, टी शर्ट असा वेष परिधान करून हे लुटारू त्यांच्या पाठीमागून आले होते.         


हे देखील वाचा :>>>>



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !