BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ जून, २०२२

राज ठाकरे यांना पुन्हा कोरोनाची लागण !



मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली असून त्यांच्या पायावर होणारी शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे.


गेल्या दोन महिन्यांपासून राज ठाकरे हे सतत चर्चेत असून त्यांच्या अनेक विधानामुळे राज्यात आणि उत्तर प्रदेशातदेखील वाद निर्माण झाले आहेत. मशिदीवरील भोंग्याचा विषय अधिक गरमागरम असताना त्यांनी उत्तर प्रदेश दौरा आयोजित केला होता परंतु उत्तर भारतीयांच्या विरोधामुळे हा दौरा त्यांनी स्थगित केला आहे. दरम्यान त्यांच्या पायाला काही त्रास होत असल्याने पायावर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे. यासाठी राज ठाकरे हे मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल देखील झाले  परंतु आता ही शस्त्रक्रिया पुढे ढकलली गेली आहे. 


काल मंगळवारीच त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार होती परंतु त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. कोरोनाच्या डेड सेल मुळे ऍनेस्थेशिया देता येत नसल्यामुळे लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्या पायावर होणारी शस्रक्रिया पुढे ढकलली असून राज ठाकरे हे रुग्णालयातून घरी गेले आहेत. 


दुसऱ्यांदा कोरोना 
कोरोना राज्यात प्रभावी असताना राज ठाकरे हे मास्कचा वापर करीत नव्हते. अनेकदा त्यांनी मास्कची खिल्ली देखील उडवली होती परंतु त्यांना २३ ऑक्टोबर २०२१ रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता पुन्हा दुसऱ्यांदा त्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. 


मुंबईत वाढता कोरोना 
मुंबई, ठाणे या शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असून चिंतेची परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. राज्यात देखील कोरोना रुग्ण वाढताना दिसत आहेत. मागील २४ तासांत राज्यात कोरोनाचे नवे ७११ रुग्ण आढळले असून मुंबईत ५०६ रुग्णांची नोंद झाली आहे. 









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !