मुंबई : राज्यात तापमानात आज किंचित घट झाली असून सोलापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा (Untimely rain ) अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून अवकाळी पावसाचा तडाखा राज्यातील अनेक जिल्ह्यांना बसला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही भागात गारपीठ देखील झाली आहे. एकीकडे उन्हाची तीव्रता आणि तापमान वाढत असताना दुसरीकडे अवकाळी पाऊस शेतकऱ्यावर आणखी एक संकट घेवून येत आहे. आता पुन्हा हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला असून त्यानुसार सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाळी वातावरण निर्माण झाले असल्यामुळे तापमान काहीसे खाली आले आहे. उन्हाची तीव्रता देखील थोडीशी कमी झाली असून कोकण, मध्य महाराष्ट्रात आणखी तीन दिवस पावसाळी स्थिती राहील परंतु उत्तर महाराष्ट्रात मात्र उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचे म्हटले आहे.
सोलापूर जिल्यात सोमवारी वादळी वारे वाहिले आणि गारासह जोरदार पाऊस झाला त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्षबागांना मोठा फटका बसलेला असून शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. शेतीसह काही घरांचे देखील नुकसान या पावसाने केले आहे त्यातच आता पुन्हा वादळी वाऱ्यासह जोरदार पाउस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिल्यामुळे चिंतेचे वातावरण वाढलेले असल्याचे दिसत आहे.
दोन दिवस पाऊस
सोलापूरसह चार जिल्ह्यात आजचा वादळी पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असला तरी आज आणि उद्या राज्यात पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करणायत आला आहे. राजस्थान, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश येथे दीड महिन्यापासून उष्णतेची लाट आहे. त्यामुळे दक्षिणेकडून उत्तरेकडे दमट वारे वाहात आहेत. परिणामी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता निर्माण होत आहे. १३ आणि १४ एप्रिल अशा दोन्ही दिवशी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Today it will rain in western Maharashtra including Solapur district) काही ठिकाणी गारा पडण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
यावर्षी चांगला पाऊस !
उन्हाची तीव्रता आणि उष्णतेची लाट राज्यात असली तरी यावर्षी पुरेसा पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाने यापूर्वीच सांगितले आहे. सरासरीच्या ९८ टक्के पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून जून ते सप्टेंबर या कालावधीत ८८० मिमी पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच म्हणजे जून महिन्यापासूनच चांगल्या पावसाला सुरुवात होणार आहे.
हे देखील वाचा :
- थरार .. टेंभुर्णीजवळ फटाक्यांचा ट्रक पेटला !
- शरद पवार यांच्या 'त्या' फोटोने राष्ट्रवादीचे राज ठाकरे यांना प्रत्युत्तर !
- धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका !
- यावर्षीच्या पावसाचा स्कायमेटचा अंदाज जाहीर !
अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !