BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ एप्रि, २०२२

रस्त्यावर थरार ......टेंभुर्णीजवळ फटाक्यांचा ट्रक पेटला !

 



टेंभुर्णी : फटाके आणि तोफा घेवून निघालेल्या मालट्रकला अचानक आग लागली आणि भर रस्त्यावर तोफांच्या आवाजाने परिसर दणाणून गेला. अचानक घडलेल्या या घटनेने अत्यंत भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. 

सोलापूर - पुणे महामार्गावर टेंभुर्णीजवळ अकुंबे गावाजवळ पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. एक मालट्रक फटाके, तोफा आणि शोभेची दारू घेवून निघालेला असताना अचानकच या ट्रकला आग लागली. ट्रक कशामुळे पेटला हे समजू शकले नाही परंतु ट्रकवर वीज पडली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पहाटेच्या दरम्यान या परिसरात विजांचा कडकडाट आणि पाऊस देखील सुरु होता. अचानक ट्रक पेटला आणि ही आग भडकत गेली. ट्रकमध्ये फटाके, तोफा आणि अन्य शोभेची दारू असल्यामुळे ही आग भडकली. ट्रकमधील फटाके आणि तोफांनी पेट घेतला आणि लागलेल्या आगीत फटाके फुटू लागले. तोफा देखील उडू लागल्या त्यामुळे क्षणार्धात या आगीने रौद्र स्वरूप धारण केले. हा सर्व प्रकार अत्यंत थरारक होता. फटाके आणि तोफांच्या आवाजाने परिसर दणाणून गेला होता. (Solapur Pune Highway) पहाटेच्या वेळी हा आवाज दूरपर्यंत जात होता आणि परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. 

चालक बचावला !
ट्रकला आग लागताच चालकाने प्रसंगावधान राखून आपला जीव वाचवला आहे. आग लागल्याने लक्षात येताच चालकाने ट्रक रस्त्याच्या बाजूला घेतला आणि ट्रक थांबवून चालकाने तेथून पळ काढला त्यामुळे ट्रक चालक बचावला आहे. (The truck carrying the firecrackers caught fire) या घटनेत सदर मालट्रक मात्र पूर्णपणे जळून खाक झाला आहे. 

वाहतूक ठप्प !
रस्त्यावरच ट्रक पेटल्याने आणि तोफांचे आवाज होत राहिल्याने वातावरण भीतीदायक तर झालेच होते पण या मार्गावरील वाहतूक देखील काही काळ ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार अभिमान गुटाळ हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ठप्प झालेली वाहतूक वळवून सुरळीत केली.

अग्निशामक यंत्रणा नाही !
भर रस्त्यावर तोफा आणि फटाके असलेल्या ट्रकला आग लागली पण अग्निशामक दलाची मदत होऊ शकली नाही. पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी अग्निशामक दलाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांची गाडी उपलब्ध होऊ शकली नसल्याची माहिती आहे. अग्निशामक दलाची वेळीच मदत का होऊ शकली नाही याचे नेमके कारण समोर आले नाही. 

 

हे देखील वाचा : 



 अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !       

    


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !