BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ एप्रि, २०२२

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका !

  



मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील लोकप्रिय असणारे नेते धनंजय मुंडे हे काल मुंबई येथे होते आणि सायंकाळपर्यंत ते पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी होते.  प्रवासाने ते थकलेले होते आणि त्यानंतर अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. छातीत दुखत असतानाच ते चक्कर येऊन खाली कोसळले. त्यानंतर त्यांना तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी सकाळपासूनच त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली असून त्यांची प्रकृती सदया स्थिर असल्याची माहिती आहे. 

धनंजय मुंडे याना हृदयविकाराचा सौम्य झटका आला असून त्यांना काही धोका नसल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे. (Dhananjay Munde suffers heart attack) मुंढे यांच्या प्रकृतीविषयी माहिती मिळताच अनेक नेते आणि कार्यकर्ते यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. 

काळजीचे कारण नाही 
धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असून कसलाही धोका नाही त्यामुळे काळजीचे काही कारण नसल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. मुंडे यांची भेट घेतल्यानंतर टोपे यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. आवश्यक त्या सर्व तपासण्या करण्यात आल्या असून सर्वकाही ठीक असल्याचे टोपे यांनी सांगितले आहे. 

कामाचा ताण 
धनंजय मुंडे हे काल परभणीस गेले होते, त्यानंतर त्यांचा जनता दरबार होता. प्रवास आणि कामाच्या ताणामुळे असे होऊ शकते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून आणखी तीन ते चार दिवस त्यांना रुग्णालयातच ठेवले जाणार आहे. 

हृदयविकार नाही !
धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका आला असल्याची बातमी पसरली आहे परंतु तसे काही नसल्याचा खुलासा उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. अजित पवार हे आज रुग्णालयात गेले आणि त्यांनी मुंडे यांची भेट घेतली . त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली आहे. सर्व तपासण्या झाल्या असून अहवाल नॉर्मल असल्याचेही समोर आले आहे.  

    

    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !