BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ एप्रि, २०२२

शरद पवार यांच्या 'त्या' फोटोने राज ठाकरे यांना उत्तर !

 



मुंबई : राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांचा एक फोटो सार्वजनिक करीत राष्ट्रवादीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सणसणीत उत्तर दिले आहे. शरद पवार यांचा हातात नारळ असलेल्या हनुमान मंदिरातील फोटो राष्ट्रवादीने ट्वीट केला आहे. 


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडाव्यादिवशी घेतलेल्या सभेत भारतीय जनता पक्षावर एक शब्दाने टीका केली नाहीच परंतु भाजपचे गुणगान गायले. 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका करणारे राज ठाकरे भाजपचे गुणगान गाऊ लागल्याने महाराष्ट्राच्या भुवया उंचावलेल्या आहेत. ईडी च्या एका नोटीसीमुळे ठाकरे यांनी आपली भूमिका बदलली असल्याची टीका देखील होत आहे. गुढीपाडव्याच्या सभेपासून मनसे बँकफुटवर गेलेली दिसत असतानाच अनेकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी राज ठाकरे यांनी ठाणे येथे 'उत्तर सभा' घेतली आणि आक्षेप खोडून काढण्याचा प्रयत्न केला. शिवाय शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांच्या नकला करीत टीका देखील त्यांनी केली. विशेष म्हणजे या सभेत देखील राज ठाकरे यांनी भाजपवर एका शब्दाने टीका केली नाही.


शरद पवार हे नास्तिक असल्याची टीका राज ठाकरे यांनी या उत्तर सभेत केली. शरद पवार हे नेहमी आपल्या भाषणात शाहू फुले आंबेडकर यांचे नाव घेतात पण छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेत नाहीत. शाहू फुले आंबेडकर यांच्याही आधी महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे. महाराजांच्या नावांने राजकारण करण्यासाठी आणि तरुणांची माथी भडकविण्यासाठी राष्ट्रवादीने संभाजी ब्रिगेडसारख्या संघटना काढल्याचा आरोप देखील राज ठाकरे यांनी केला होता. (NCP's reply to Raj Thackeray through photo)


राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर 
शरद पवार हे नास्तिक असून ते मंदिरात गेल्याचा एखादा तरी फोटो आहे काय ? असा सवाल राज ठाकरे यांनी केला होता. ठाकरे यांचा मुद्दा खोडून काढण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी थेट शरद पवार यांचा मंदिरातील एक फोटोच  सार्वजनिक केला आहे. या एका फोटोनेच राज ठाकरे (MNS Raj Thakray) यांच्या आरोपाला उत्तर दिले आहे. शरद पवार हे एका हनुमान मंदिरात पूजा करीत असून त्यांच्या हातात नारळ असलेला हा  फोटो आहे आणि  हा फोटोच राज ठाकरे यांच्या 'नास्तिक' शब्दाला उत्तर देण्यासाठी पुरेसा ठरला आहे. 


पोरकट आजोबा 
राज ठाकरे हे आजोबा होऊनही पोरकटपणा करीत असल्याची टीका राष्ट्रवादीने केली आहे. राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आणि प्रवक्ते रविकांत वरपे यांनी अत्यंत तिखट ट्विट केले आहे 'आजोबा होऊनही पोरकटपणा करणाऱ्या राज ठाकरे यांनी आजपर्यंत जेवढ्या सभा घेतल्या नाहीत त्यापेक्षा कैकपटीने जास्त मंदिरांना सभामंडप देण्याचे आणि तीर्थस्थळांचा विकास करण्याचे काम पवार यांनी केले आहे' अशी  चपराक वरपे यांनी लगावली आहे. 'श्रद्धेचा बाजार भरऊन पवार हे धर्माच्या नावाने मतांचा जोगवा मागत नाही एवढाच फरक आहे' असे देखील त्याची म्हटले आहे.


राज ठाकरे यांचे आरोप 
राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार हे स्वतः नास्तिक आहेत, ते धर्म, देव मानत नाहीत. याच पद्धतीने ते राजकारण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मी जातीवाद भडकावतो, भूमिका बदलतो यावर पवारांनी बोलावे का ? विदेशी व्यक्ती देशाचा पंतप्रधान नको या मुद्द्यावर पवार हे काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्याच काँग्रेससोबत जाऊन कृषिमंत्री झाले. आजवर शरद पवार यांनी अनेकदा भूमिका बदलल्या आहेत.  

 

हे देखील वाचा : 



 अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !       


             


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !