मुंबई : उन्हाची तीव्रता वाढत असतानाच स्कायमेटने मोठा दिलासा दिला असून यावर्षी देशातील पावसाची परिस्थिती सामान्य रहाणार असल्याचा अंदाज (Rainfall normal) हवामानाची माहिती देणाऱ्या स्कायमेट या खाजगी संस्थेने व्यक्त केला आहे.
देशातील यावर्षीच्या पावसाचा अंदाज ओस्ट्रेलियन हवामान विभागाने या आधीच व्यक्त केला असून देशात आणि महाराष्ट्रात देखील यावर्षी पाऊस चांगला होणार असल्याचे सांगितले होते. त्या पाठोपाठ आज स्कायमेट ने देखील आपला अंदाज जाहीर केला असून भारताला दिलासा देणारा हा अंदाज ठरला आहे. देशात जून ते सप्टेंबर या काळात मान्सून सरासरीच्या ९८ टक्के राहणार असल्याचा हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यात पाच टक्क्यांचा कमी अधिक फरक होऊ शकतो. या आधी स्कायमेट या संस्थेने फेब्रुवारी महिन्यात अंदाज व्यक्त केला होता त्यावेळीही यावर्षीचा मान्सून सामान्य असणार असेच सांगण्यात आले होते आणि आज जारी केलेल्या अंदाजात देखील पूर्वीच्या अंदाजाप्रमाणेच पाऊस होणार असल्याचे म्हटले आहे.
भारतीय अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात पावसावर अवलंबून असते आणि ग्रामीण अर्थव्यवस्था तर या पावसाशीच निगडीत असते. पाऊस जर कमी प्रमाणात झाला तर ही सगळी अर्थव्यवस्था कोलमडून पडते आणि याचा परिणाम कार्पोरेट कंपन्यापासून शहरी जीवनापर्यंत होत असतो. त्यामुळे पावसाचा अंदाज हा सर्वांसाठी महत्वाचा ठरतो. स्कायमेट ही खाजगी हवामान संस्था असून भारतीय हवामान विभागाचा देखील अंदाज या महिन्याच्या अखेरीपर्यंत जारी होईल. दरम्यान आत्तापर्यंत जाहीर झालेल्या सर्वच अंदाजात यावर्षी मुबलक पाऊस होणार असल्याचाच अंदाज ( Rainfall normal,Skymet's forecast released) असून यावर्षी हा पाऊस जून महिन्यापासूनच सुरु होणार असल्याचे सांगितले गेले आहे.
सरासरीपेक्षा अधिक पाऊस
स्कायमेटच्या अंदाजानुसार पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, उत्तर भरतीतील कृषी क्षेत्र, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील पावसावर अवलंबून असलेल्या भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. राजस्थान, गुजरात, नागालंड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा या राज्यात सामन्यापेक्षा कमी पाऊस होऊ शकतो. जुलै ऑगष्ट मध्ये केरळ आणि कर्नाटकात काहीशी घट पाहायला मिळू शकते.
जून महिन्यात दमदार
गेल्या काही वर्षांपासून जून महिन्यात शक्यतो पुरेसा पाऊस होत नाही परंतु यावर्षी पावसाळ्याची सुरुवातच दमदार होणार आहे. जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाची दमदार सुरुवात होणार आहे. जून महिन्यात ७० टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करणायत आला असून सामान्य पावसांच्या अंदाजापेक्षा २० टक्के जास्त पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
असा असले उत्तरार्ध
पूर्वार्धात उत्तरार्धापेक्षा अधिक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जून महिन्यात ७० टक्के सामान्य पावसाचा अंदाज असला तरी जुलै महिन्यात तो ६५ टक्के, ऑगष्ट महिन्यात ६० टक्के आणि सप्टेंबर महिन्यात २० टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मागील वर्षी चांगला पाऊस झाला असतानाच सलग दुसऱ्या वर्षीही समाधानकारक पावसाचे अंदाज येत आहे त्यामुळे शेतकरी वर्गासाठी सुखावणारा हा अंदाज आलेला आहे
हे देखील वाचा :
अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !