मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना धमक्या येत असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जेष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी दिली असून झेड प्लस सुरक्षेची मागणी करण्यात आली आहे.
गुढीपाडव्याच्या सभेपासून मनसे अध्यक्ष पुन्हा एकदा चर्चेत आले असून त्यांच्या जाहीर सभेतील काही विधानांमुळे वाद निर्माण होत आहे. बाबासाहेब पुरंदरे विषयावरून खडाजंगी सुरु झाली असतानाच मशिदीवरील भोंगे काढण्याचा विषय देखील धुमसत आहे. अशा परिस्थितीत राज ठाकरे यांना धमक्या येवू लागल्याने चिंता व्यक्त होत आहे. मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंत अल्टीमेटम दिल्याने वातावरण तापले असतानाच काही मुस्लीम संघटनांनी या भूमिकेला विरोध दर्शवला आहे. या विरोधानंतरही ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम असून कालच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना 'तयार' राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
मशिदीवरील भोंग्याचा विषय तापत चाललेला असतानाच राज ठाकरे यांना धमक्या येत आहेत. फोनवरून तसेच सोशल मीडियावरूनदेखील त्यांना धमक्या येत आहेत. या धमक्यांचे मेसेज आपण स्वत: वाचले आहेत असे देखील बाळा नांदगावकर यांनी सांगितले आहे. या धमक्यामुळे चिंता व्यक्त होत असून राज ठाकरे यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी नांदगावकर यांनी केली आहे.
अयोध्या दौऱ्यावर जाणार !
राज ठाकरे हे ५ जून रोजी अयोध्या येथे जाणार असल्याचे त्यांनी कालच जाहीर केले आहे तसेच तत्पूर्वी त्यांची औरंगाबाद येथे जाहीर सभा देखील आहे. त्यामुळे धमक्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांना सुरक्षा दिली जाण्याची शक्यता आहे. राज्य आणि केंद्र शासनाकडे सुरक्षेची मागणी केली जाणार असल्याचे बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
सुरक्षा हटवली होती !
राज ठाकरे यांना या आधी झेड प्लस सुरक्षा देण्यात आली होती परंतु काही महिन्यांपूर्वीच राज्य शासनाने ती कमी केली होती. झेड प्लसऐवजी त्यान वाय प्लस सुरक्षा दिली होती. सुरक्षा कमी केल्याने राज्यात मोठी चर्चा झाली होती. (Threats to Raj Thackeray, demand for security) आता मात्र केंद्र सरकारच राज ठाकरे यांना सुरक्षा देणार असल्याची चर्चा आहे.
धमकीची चौकशी करू !
राज ठाकरे यांच्या धमकीबाबत शासनाकडे अथवा गुप्तचर यंत्रणांकडे अद्याप काही माहिती नाही पण त्यांच्या सुरक्षेची चिकित्सा करण्यात येईल आणि त्यांना देण्यात आलेल्या धमक्यासंदर्भात चौकशी करणायत येईल असे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी म्हटले आहे.
हे देखील वाचा : (बातमीवर क्लिक करा )
- चिमुटभर तंबाखुसाठी साखर कारखाना कामगाराचा खून !
- खोटे बोल पण रेटून बोल !
- पंढरपूर- मिरज मार्गावरील अपघातात पोलीस ठार !
- शेतकऱ्याचं पोरगं डॉक्टर होणार, गावाला कौतुक !
- नागाला मारल्याने नागीण घेतेय बदला !
- राज ठाकरे यांना पंढरीतून आव्हान !
अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !