पंढरपूर : बाबासाहेब पुरंदरे यांचे समर्थन करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पंढरीतील व्याख्याते आणि शिवचरित्र अभ्यासक अमरजित पाटील यांनी खुल्या चर्चेचे खुले आव्हान दिले आहे.
जेम्स लेन या लेखकाने लिहिलेल्या पुस्तकाच्या बाबतीत गेल्या अनेक वर्षांपासून वाद असून या पुस्तकात खोटा इतिहास लिहिण्यात आल्याचा आरोप करून संभाजी ब्रिगेडने पूर्वीपासूनच आक्रमक भूमिका घेतलेली आहे. या पुस्तकासाठी महाराष्ट्रातील बाबासाहेब पुरंदरे यांनी माहिती पुरविली असल्याबाबत मोठा वादंग गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे. जेम्स लेन याने अत्यंत खोटा आणि संतापजनक असा मजकूर लिहिला असल्याने आणि त्याला पुरंदरे यांनी मदत केली असल्याने संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) पुण्याच्या भांडारकर संस्थेवर हल्ला चढवला होता. यात पंढरपूर येथील अभ्यासक अमरजित पाटील यांचाही सहभाग होता.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात बदनामीकारक मजकूर लिहिलेल्या जेम्स लेन याला मदत केल्यामुळे संभाजी ब्रिगेडने पुरंदरे यांचा अनेकदा निषेध केला आहे पण याच पुरंदरेचे समर्थन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सतत करीत आलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून हा विषय पुन्हा चर्चेला आला असून राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी देखील या विषयी महत्वपूर्ण भाष्य केलेलं आहे. राज ठाकरे यांनी जाहीर सभेत हा विषय घेतल्याने त्याची चर्चा पुन्हा होऊ लागली असून आता या जेम्स लेन ने खुलासा केला आहे. पुरंदरे यांनी आपल्याला कसलीही माहिती दिली नसल्याचे त्याने म्हटले आहे.
एकूण प्रकरणावर अमरजित पाटील यांनी तथाकथित इतिहासकारांना क्लीन चीट देणारे बदनामीच्या कटात सहभागी असल्याचे म्हटले आहे. राज ठाकरे सतत छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र पुरंदरे यांनीच घराघरात पोहोचवले असल्याचे सांगत असतात, जेम्स लेन याला सदर पुस्तक लिहिण्यास मदत करणाऱ्या तथाकथित इतिहासकारांना त्यांच्याकडून क्लीन चीट दिली जाते तेच या बदनामीच्या कटात सहभागी आहेत असा रोकठोक आरोप अमरजित पाटील यांनी केला आहे. (Amarjit Patil's challenge to Raj Thackeray) जेम्स लेन याला मदत करणाऱ्या बहुलकर यांना शिवसैनिकांनी काळे फासले होते तेंव्हा याच राज ठाकरे यांनी बहुलकर यांच्या घरी जावून शिवसैनिकांच्या कृत्याबाबत माफी मागितली होती त्यामुळे ठाकरे हे देखील या कटात साक्षीदार बनलेले आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.
पाटील यांचे आव्हान !
पुरंदरे यांचे समर्थन करणाऱ्या राज ठाकरे यांना पाटील यांनी खुल्या चर्चेचे खुले आव्हान दिले आहे. यापूर्वी पुरंदरे यांनाच चर्चेत हरवलेले आहे आणि त्यांच्याकडून माफीनामा देखील घेतलेला आहे. राज ठाकरे यांनी पुरंदरे यांनी लिहिलेल्या पुस्तकावर खुली चर्चा करावी असे आव्हान पाटील यांनी दिले आहे.
शासनाने पुढाकार घ्यावा
हल्ली कुणीही उठून चुकीची विधाने करीत आहे त्यामुळे सामाजित वातावरण दुषित होत आहे. शासनानेच पुढाकार घेवून इतिहास तज्ञांची समिती तयार करून अधिकृत पुराव्याच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र प्रकाशित करावे अशी मागणीही अमरजित पाटील यांनी केली आहे.
हे देखील वाचा : (बातमीवर क्लिक करा )
- पंढरपूर - मोहोळ रस्त्यावर मोठा अपघात !
- बारामती खवळली ! सदावर्तेची जीभ हासडणाऱ्यास लाखोंचे बक्षीस जाहीर !
- सोलापुरी पठ्या सायकलवरून पोहोचला दिल्लीला !
- सोलापूर जिल्ह्यातील दोन गावात एकाच दिवशी रोखले तीन बालविवाह !
अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !