रामपूर : नागाला मारल्यानंतर नागीण त्याचा बदला घेते असे अनेकादा हिंदी चित्रपटात दाखवले जाते. नाग अथवा नागीण बदला घेते असा आजही अनेकांचा गैरसमज आहे परंतु असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशात घडत असून या घटनेची मोठी चर्चा होत आहे.
नाग नागीण जोडीदाराच्या मृत्यूचा बदला घेतात, नागाची हत्या करणाऱ्याचा फोटो नगीण आपल्या डोळ्यात साठवते आणि नंतर त्याला शोधात दंश करून बदला घेते असे अनेक समज रूढ झाले आहेत. साप, नाग, नागीण असा कुठलाही बदला घेत नसते याबाबत अभ्यासकांनी वेळोवेळी सांगितले आहे पण तरीही अजूनही अनेकांच्या मनात ही अंधश्रद्धा घर करून बसलेल्या आहेत. आणि त्याला पुष्टी देणारी आणखी एक घटना घडली असून या घटनेची चर्चा देशभर होऊ लागली आहे. नागाला मारल्यानंतर नागिणीने अनेकदा दंश केल्यामुळे (Sanke bite) ही घटना अधिक चर्चेची झाली आहे.
मिर्जापूर गावात राहणाऱ्या एहान उर्फ बबलू याचा सामना एक नाग आणि एका नागिणीसोबत सहा महिन्यापूर्वी झाला होता. एहानने यावेळी काठीने नागाला मारून टाकले होते आणि यावेळी नागीण आपला जीव वाचवून पळून गेली होती. ही घटना एहान विसरूनही गेला पण एके दिवशी नागिणीने त्याला गाठले आणी एहानला दंश केला. तातडीने त्याच्यावर उपचार करण्यात आले त्यामुळे त्याचा जीव वाचला. यावेळी त्याच्या मनात फारसे काही आले नाही पण नागीण सारखेच त्याला गाठून लागली आणि दंश करू लागली. एका पाठोपाठ एक असे संधी मिळताच एहानवर नागिणीने सात वेळा दंश केला आहे त्यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे. (Revenge for killing the cobra) या दरम्यान एहानने या नागीणीला मारण्याचा देखील प्रयत्न केला पण त्याच्या हातून ती निसटून गेली.
या घटनेची मोठी चर्चा होत असून नागाला मारल्यानेच नागीण त्याचा बदला घेत आहे असा अनेकांचा समज झालेला आहे. शेतात काम करताना एकदा दोनदा नव्हे तर तब्बल सात वेळा नागिणीने एहानला दंश केला आहे आणि प्रत्येक वेळी तो वाचला आहे. नागीण सूड घेत असल्याची अनेकांची भावना झाली असून एहान देखील आता प्रचंड दहशतीत जगत आहे. या नागिणीची प्रचंड भीती त्याच्या मनावर आहे. चित्रपटात दाखवतात अशीच ही घटना असून वारंवार नागीण त्याला दंश करीत असल्यामुळे अनेकांची मती गुंग झाली आहे. हे असे का घडतेय याचे उत्तर कुणाकडेच नाही.
मला काही झालं तर --
एहान सतत या नागिणीच्या दहशतीखाली जगत असून आपला जीव ही नागिणीच घेणार असे त्याला वाटू लागले आहे. 'मला चार मुलं आहेत, मी सतत घाबरून जगत आहे, मला काही झाले तर माझ्या मुलांचे काय होणार याची चिंता लागून राहिली आहे' असे हा एहान सांगत आहे.
मध्य प्रदेशात अशीच घटना !
मध्य प्रदेशातील जोशीपूर गावात चैत्र नवरात्रीचा जावरा पूजा कार्यक्रम सुरु असताना एका तरुणाला त्याच्या घराजवळ एक नाग दिसला. किशोरी लाल आणि त्याच्या कुटुंबीयांनी या नागाला मारून टाकले आणि फेकून दिले. त्यानंतर पुन्हा पूजा सुरु झाली आणि या कुटुंबीयांनी पूजा केली. नागाला मारून टाकल्याची घटना त्यांच्या दृष्टीने फार काही विशेष ठरली नाही. नेहमीप्रमाणे हे कुटुंब रात्री झोपी गेले. दरम्यान रात्री दोन वाजण्याच्या सुमारास एक नागीण त्यांच्या घरात घुसली आणि झोपलेल्या रोहित नावाच्या मुलाला दंश केला. दंश होताच रोहित जागा झाला आणि आरडाओरडा सुरु केला. त्याच्या आवाजाने कुटुंबीय जागे झाले. एकूण प्रकार पाहून कुटुंबीय भलतेच घाबरून गेले.
मुलाचा जीव गेलाच !
रोहितला दंश केल्याचे पाहून घरातील सर्वांनाच धक्का बसला होता. दरम्यान त्यांनी त्या दंश करणाऱ्या सापाला देखील मारून टाकले आणि रोहितला रुग्णालयात हलविण्यात आले. होशिंगाबाद येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले परंतु रोहितची प्रकृती अत्यवस्थ झाली होती. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला भोपाळ येथे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. (Killed the snake, bitten by the snake at night) परंतु रस्त्यातच रोहितचा मृत्यू झाला. या घटनेची परिसरात मोठी चर्चा होत असून बदल्याच्या भावनेने हा प्रकार घडल्याचा अनेकांचा गैरसमज झाला आहे. अशा कुठल्याही घटनेच्या सत्यतेचा दावा आम्ही करीत नाही
हे देखील वाचा : (बातमीवर क्लिक करा )
- राज ठाकरे यांना पंढरीतून आव्हान !
- पंढरपूर - मोहोळ रस्त्यावर मोठा अपघात !
- बारामती खवळली ! सदावर्तेची जीभ हासडणाऱ्यास लाखोंचे बक्षीस जाहीर !
- सोलापुरी पठ्या सायकलवरून पोहोचला दिल्लीला !
- सोलापूर जिल्ह्यातील दोन गावात एकाच दिवशी रोखले तीन बालविवाह !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !